"नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांचा निरोप घेऊन २ बडे नेते वर्षावर गेले होते, निरोप होता राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे" - प्रियम गांधी मोदी

"नोव्हेंबर महिन्यात शरद पवारांचा निरोप घेऊन २ बडे नेते वर्षावर गेले होते, निरोप होता राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यास तयार आहे" - प्रियम गांधी मोदी

मुंबई : २०१९ च्या महाराष्ट्राच्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांनंतर राज्यात काय काय घडामोडी घडल्यात याचे आपण सर्वजण साक्षीदार आहोत. कुणाला वाटलेही नसेल की शिवसेना खरंच भारतीय जनता पक्षापासून फारकत घेत वेगळा मार्ग अवलंबेल. शिवसेना NDA मधून बाहेर पडेल किंवा महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल. या दरम्यानही देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतलेली मुख्यमंत्रीपदाची आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ महाराष्ट्रातील राजकारणात भूकंप आणणारी होती. त्या शपथेमागील कारणे आज एक वर्ष झालं तरीही कुणालाही समजलेली नाहीत. 

विधानसभेवेळी घडलेल्या या सर्व घटना आपण पहिल्या आणि अनुभवल्या देखील. दरम्यान, शिवसेना भाजपचं फिस्कटलं तेंव्हा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे एकमेकांसोबत कसे आलेत, अचानक देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत घेतलेली शपथ यावेळच्या पडद्यामागील घटना काय होत्या, याबाबत खुलासा करणारं 'ट्रेडिंग पावर' नामक पुस्तक नुकतंच प्रकाशित झालंय. प्रियम गांधी मोदी यांनी हे पुस्तक लिहिलंय. 

प्रियम गांधी मोदी  यांनी २०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांवर लिहिलेल्या 'ट्रेडिंग पावर' या पुस्तकात अनेक खळबळजनक बाबींचा उल्लेख केलाय. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार हे भाजपाला समर्थन देण्यासाठी तयार होते असा उल्लेख देखील एका प्रकरणात करण्यात आलाय. सोबतच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात कशाप्रकारचे मेसेजेसवरून बातचीत झाली आणि 'तो' पहाटेचा शपथविधी कसा पार पडला यावर देखील भाष्य करण्यात आलंय. 

लेखिका प्रियं गांधी मोदी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली त्यात त्या म्हणालात की,  "महाराष्ट्रात जेंव्हा पोलिटिकल सर्कस सुरु होती तेंव्हा अशा अनेक गोष्टी होत्या ज्या बाहेर येत होत्या. मात्र, अशा अनेक बाबी होत्या ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत, बाहेर आल्या नाहीत. आज महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होतंय. अशात  महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत. आता नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळायला हवीत, जी या पुस्तकातून मिळतील, म्हणून मी हे पुस्तक लिहिले आहे."

त्या पुढे म्हणाल्यात की, "शरद पवारांचा निरोप घेऊन नोव्हेंबर महिन्याच्या सुरवातीला वर्षा बंगल्यावर NCP चे दोन बडे नेते गेलेत. यामध्ये शरद पवारांना भाजपाला समर्थन देण्यास आक्षेप नसल्याचा हा मेसेज होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांच्याशी बातचीत केली आणि त्यानंतर लगेच दुसऱ्याच दिवशी अमित शहांच्या घरी बैठक झाली. या बैठकीत शरद पवार, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे नेते उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता समीकरणांची सर्व बातचीत झाली. कुणाला कोणते मंत्रीपद मिळणार हे देखील ठरलं होतं. यावेळी राज्यात राष्ट्र्वापती राजवट आणण्यात NCP मदत करेल हेही या ठरलं होतं. राष्ट्रपती राजवटीनंतर काही दिवसांनी शरद पवार माध्यमांसमोर येऊन राज्याला स्थिर सरकारची गरज असल्याचे सांगून भाजपच्या सोबत जातील" असं लेखिका म्हणाल्यात.

दरम्यान राष्ट्रवादीला महाविकास आघाडीसोबत काम करताना जी पावर मिळणार होती ती कदाचित भाजप सोबत गेल्याने मिळाली नसती म्हणून शरद पवार हे भाजपसोबत गेले नसावेत असं लेखिका म्हणाल्यात. 

या सोबतच पहाटेच्या मुहूर्तावर झालेल्या शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात मेसेजेसवर काय बातचीत झालेली हे देखील लेखिकेने या पुस्तकात नमूद केलं आहे.

trading power book by priyam gandhi mody says sharad pawar was ready to go with BJP in 2019 state election

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com