इतर राज्यांमधून शाॅपिंगसाठी आलेल्यांमुळे कोरोनाच्या केसेसमध्ये भर; मुंबईतील डॉक्टरांचा महत्त्वाचा निष्कर्ष

इतर राज्यांमधून शाॅपिंगसाठी आलेल्यांमुळे कोरोनाच्या केसेसमध्ये भर; मुंबईतील डॉक्टरांचा महत्त्वाचा निष्कर्ष

मुंबई : राज्य सरकारने महाराष्ट्रात जर प्रवेश करायचा असेल तर गुजरात, दिल्ली, गोवा आणि राजस्थान या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक केली असताना मुंबईतील डॉक्टरांनी बाहेरुन येणाऱ्या लोकांमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचा निष्कर्ष लावला आहे. परराज्यातील शाॅपिंगसाठी आलेल्यांमुळे कोरोनाच्या केसेसमध्ये भर पडत असून इतर राज्यांतून येणाऱ्या लोकांची चाचणी होण्याची मोठ्या प्रमाणात गरज असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांना मुंबईतील डॉक्टरांनी सांगितलं की, राजस्थान आणि गुजरात या दोन शहरातून लग्नाची खरेदी करण्यासाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात लोक येतात. जिथे आधीपासुनच भयानक परिस्थिती आहे. त्यासोबतच उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशमध्ये ही सारखीच स्थिती आहे. ही दोन्ही राज्ये आणि उत्तरेकडील इतर काही राज्येही सध्या कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहेत.

अश्या प्रकारे परराज्यातील लोकांवर इथे होणाऱ्या उपचारांमुळे इथल्या संपुर्ण यंत्रणेवर त्याचा परिणाम होऊन मुंबईतले लोकं उपचारांपासून वंचित राहाण्याची भीती डाॅक्टरांनी व्यक्त केली आहे. तसेच परराज्यातील आलेल्या लोकांमुळे इथल्या केसेसच्या संख्येत वाढ होण्याचा धोका आहेच. नक्की अशा रूग्णांचा आकडा मात्र मिळू शकलेला नाही. मात्र, ही संख्या नक्कीच जास्त असेल. अशा प्रकारे केसेस वाढल्याने संपूर्ण यंत्रणेवर ताण येऊन गेल्या आठ महिन्यांच्या कामावर पाणी फिरू शकतं. 

बॉम्बे रुग्णालयातील ज्येष्ठ फिजीशियन डॉ. गौतम भन्साळी यांच्याकडे राजस्थानमधून नातेवाईकांना भेटायला आलेले तीन कोव्हिड रूग्ण आहेत. तर उत्तर प्रदेशातील इतर तीघे हे खरेदीसाठी मुंबईत आले होते. 

ज्येष्ठ पल्मोनोलॉजिस्ट डॉ. जलील पारकर यांनी सांगितले की, कोरोनाची दुसरी लाट रोखण्यासाठी योग्य ती काळजी घ्यायला हवी, अन्यथा रूग्णांसाठी बेड शिल्लक राहणार नाहीत अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने याआधीच गुजरात, राजस्थान, गोवा आणि दिल्लीवरून येणाऱ्या लोकांना आरटी-पीसीआर चाचणीची अट बंधनकारक केली आहे. या राज्यात कोरोनाने सध्या धुमाकूळ घातला आहे. 

दररोज 50,000 प्रवासी मुंबईत दाखल- 

दररोज मुंबईत परराज्यातून 50 हजार प्रवासी येत असून या चार राज्यातून आलेल्या आतापर्यंत 5000 प्रवाश्यांवर सध्या पालिकेची नजर आहे.

( संपादन - सुमित बागुल )

people coming from other states for shopping are reason of increasing covid count in maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com