Thane News: शहरात वाहतूक कोंडींसह रस्त्यांची चाळण, प्रवाशांचे हाल; खड्डे भरण्यासाठी पोलिसांचे परिश्रम
Ulahasnagar Traffic: शहाड रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी उल्हासनगर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी परिश्रम केल्याची कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
उल्हासनगर : एकीकडे वाहतूक कोंडी सुरळीत करतानाच दुसरीकडे शहाड रेल्वे उड्डाणपुलावरील खड्डे भरण्यासाठी उल्हासनगर वाहतूक विभागाच्या पोलिसांनी तब्बल ५ तास परिश्रम केल्याची कामगिरी बजावली आहे.