काळबादेवीत महिलेची दादागिरी! वाहतूक पोलिसाला मारहाण; दोघांना अटक 

अनिश पाटील
Saturday, 24 October 2020

काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली.

मुंबई ः काळबादेवी परिसरात कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे महिलेची दादागिरी पाहायला मिळाली. या महिलेने एका वाहतूक पोलिसाला शिव्या दिल्याचा आरोप लावत मारहाण केली. चक्क महिलेने कॉलर पकडून कानशिलात लगावली. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सादविका रमाकांत तिवारी (वय 30, रा. मशीद बंदर) आणि मोहसीन निजामउददीन खान (26, रा. भेंडी बाजार) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. 

मुंबईतून हिरेदागिने निर्यातीत वाढ; अमेरिका युरोपात भारतीय हिरे उद्योगाची आगेकूच कायम

कॉटन एक्‍स्चेंज नाका येथे वाहतूक पोलिस हवालदार एकनाथ पारठे हे आपले कर्तव्य बजावत असताना सादविका या महिलेसोबत एक व्यक्ती होता. त्याने हेल्मेट घातलेले नव्हते. त्यामुळे या महिलेने वाद करून वाहतूक हवालदार पारठे यांना मारहाण केली. त्यांची नेमणूक काळबादेवी ट्राफिक डिव्हीजन येथे करण्यात आली होती. याप्रकरणी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

राज्यातील ऑनलाईन परीक्षांवर सायबर हल्ल्याचा संशय; चौकशीसाठी समिती स्थापन

या वादाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या व्हिडीओत महिला वाहतूक पोलिसाने शिवी दिल्याचा दावा करत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलेने रस्त्यावर लोकांना जमवून वाहतूक पोलिसांच्या श्रीमुखात लगावली. पोलिसांनी या आरोपांचे खंडन केले आहे. महिलेला कोणत्याही प्रकारची शिवी दिली नसून त्यांना पोलिसाने "सर' व "मॅडम' असे म्हणत समजावण्याचा प्रयत्न केला. पारठे यांना मारहाण व शिवीगाळ होत असताना त्यांनी दाखवलेल्या संयमाचे सहपोलिस आयुक्त यशस्वी यादव यांच्याकडून कौतुक करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traffic police assault case Both arrested