esakal | बाप्पाचे आगमन सुकर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस डे-नाईट ऑन ड्युटी
sakal

बोलून बातमी शोधा

बाप्पाचे आगमन सुकर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस डे-नाईट ऑन ड्युटीवर

बाप्पाचे आगमन सुकर करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस डे-नाईट ऑन ड्युटीवर

sakal_logo
By
दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर : शुक्रवारी बाप्पाच्या मूर्तीची स्थापना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात, घरात होत आहे. त्या अनुषंगाने बाप्पाचे आगमन सुकर करण्यासाठी उल्हासनगर ट्रॅफिक पोलीस डे-नाईट ऑन ड्युटी राहणार आहेत. सहायक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड यांनी ही माहिती दिली.

हेही वाचा: वसई-विरार महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; वाचा सविस्तर

गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत येत आहेत. त्यामुळे उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी वाहतूक विभागाच्या हद्दीमध्ये नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास होऊ नये, याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी शिरोळे, उपनिरीक्षक गोरक्षनाथ वाघ यांच्या उपस्थितीत फिक्स पॉईंट, गस्ती पथक कार्यरत करण्यात आले आहे.

त्यात नेहरू चौक, फॉरवर्ड लाईन, शिवाजी चौक, शास्त्री चौक, शहाड रेल्वे स्टेशन, जकात नाका, 17 सेक्शन, पवई चौक, श्रीराम चौक, जंगल हॉटेल, बाळासाहेब ठाकरे स्टेडियम रोड, नेताजी रोड, मठमंदिर, कैलास कॉलनी या फिक्स पॉइंटचा समावेश आहे.

याच भागातून बाप्पाचे आगमन आज रात्री पासून, होणार असल्याने या सर्व भागांमध्ये बाप्पाच्या आगमनाचा मार्ग सुकर करण्यासाठी ट्रॅफिक विभागाचे 60 पोलीस डे-नाईट ऑन ड्युटीवर तैनात करण्यात आल्याचे सहायक पोलीस आयुक्त दत्ता तोटेवाड यांनी सांगितले.

loading image
go to top