esakal | वसई-विरार महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; वाचा सविस्तर
sakal

बोलून बातमी शोधा

vasai virar municipal

वसई-विरार महापालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या; वाचा सविस्तर

sakal_logo
By
संदीप पंडित

विरार: वसई-विरार महानगरपालिकेतील (vasai-virar municipal) ठेक्यावरील अभियंत्यांच्या बदल्या नंतर (Engineer transfers) आता सहाय्यक आयुक्तांच्याही बदल्या कऱण्यात आल्या आहेत. सहाय्य्क आयुक्त असलेल्या प्रताप कोळी (Pratap koli) यांची बदली तलासरी येथे नगरपंचायतीचे मुख्याधिकारी म्हणून करण्यात आली आहे. तर अंगाई साळुंके (Angai salunke) यांची बदली पाळी नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदी नेमणूक करण्यात आली आहे तर सहाय्यक आयुक्त असलेल्या पंकज भुसे (pankaj bhuse) यांची मुरुड जंजिरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. ही बदली नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांच्या आदेशाने करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा: 'BMC' मध्ये कंत्राटी पद्धतीने कामगारांची भरती; फेरिवाल्यांवर होणार कारवाई ?

वसई विरार पालिका क्षेत्रात वाढलेल्या अनधिकृत बांधकामा बाबत न्यायालयाने ठपका ठेवला असून ,ही बांधकामे वाढीला अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याचा आरोप या ठिकाणी खुलेआमपणे करण्यात येत होता. शहरात नऊ हजार अनधिकृत बांधकामे असून त्यावर कारवाई करण्या ऐवजी अश्या बांधकामांना संरक्षण देण्याचे काम सुरु असतानाचं शहरात मोठ्या प्रमाणात फेरीवाले रस्त्यावर बसत असताना त्यांच्याकडे "अर्थपूर्ण" दुर्लक्ष अधिकारी करत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पालिकेत प्रशासक गंगाधरण डी यांनी अनेक विभागात बदल्याचे सत्र सुरु केले असतानाच राज्य सरकारनेही तक्रारीची दाखगल घेत अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचे बोलले जात आहे. यात प्रताप कोळी आणि पंकज भुसे यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या त्यामुळे त्यांची येथून उचलबांगडी केल्याचे बोलले जात आहे.

loading image
go to top