Mumbai News : वाहतूक पोलिसांवर आली खड्डे बुजविण्याची वेळ; केडीएमसी प्रशासन मात्र सुस्तच

केडीएमसी प्रशासन सुस्त असल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वेळ ही वाहतूक पोलिसांवर आली आहे.
Mumbai News
Mumbai Newssakal

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांमुळे दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजविण्याच्या सूचना केडीएमसी अधिकारी कंत्राटदारांना करतात परंतू खड्डे काही बुजले जात नाहीत. या खड्ड्यांनी वाहतूक कोंडी होत आहे.

केडीएमसी प्रशासन सुस्त असल्याने रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची वेळ ही वाहतूक पोलिसांवर आली आहे. वाहतूक सुरळीत करणे तसेच अपघात होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनी हे पाऊल उचलले असले तरी यातून पालिका अधिकारी काही बोध घेणार का ? हे पहावे लागेल.

कल्याण डोंबिवली शहरातील रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. केडीएमसी शहर अभियंत्यांनी खड्ड्यांची पाहणी केल्यानंतरही रस्त्यांची अवस्था काही सुधारलेली नाही.

Mumbai News
Mumbai News : मुंबईत नाशिक महामार्गावरील खडवली फाटा बनला मृत्युचा सापळा...

या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावून शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. तसेच अपघात होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. ही परिस्थिती पाहता तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनीच कंबर कसली असल्याचे चित्र दिसत आहे.

कल्याण तसेच डोंबिवली वाहतूक विभागाने रस्त्यावर उतरत काही महत्त्वाच्या रस्त्यावरील खड्डे हे स्वतः तात्पुरत्या स्वरुपात त्यात भराव टाकून बुजविले आहेत. कल्याण शिवाजी चौक, डोंबिवलीतील टिकळ चौक आदि भागातील खड्डे वाहतूक विभागाने भरुन काढले आहेत.

केडीएमसी प्रशासन सुस्त असल्याने वाहतुक विभागाने हे पाऊल उचलले आहे. तात्पुरत्या स्वरुपात हे खड्डे वाहतूक पोलिसांनी भरले असले तरी काही तासांतच रस्त्यांची पुन्हा तिच अवस्था होणार आहे. मात्र त्यांनी प्रयत्न तरी केला असे म्हणत नागरिक त्यांचे कौतुक करत आहेत. परंतू यावर कायम स्वरुपी उयाययोजना का केल्या जात नाहीत ?

Mumbai News
KDMC: '..अन्यथा 27 गाव आणि पलावा मधील नागरिक कर भरणार नाहीत' मनसेचे आमदार राजू पाटील कडाडले

पालिका अधिकारी शहराचा दौरा करतात केवळ त्यावर पुढे काही काम होताना दिसत नाही. मग दौरे करतातच कशाला ? असा सवाल नागरिक करत आहेत. वाहतूक विभागाने उचललेल्या पावलानंतर आता तरी पालिका प्रशासन जागे होते का ? हे पहावे लागेल.

मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांचे खोचक ट्विट

कल्याण मधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रस्त्यावरील खड्डे कल्याण वाहतूक विभागाने रविवारी भरले. या चौकापासून 100 मीटर अंतरावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मुख्यालय आहे.

पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे तेथून पालिकेचा कारभार पाहतात. महापालिका हद्दीतील रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधीचा निधी मंजुर करुन आणल्याचे फलक लावून ते निघाले सुद्धा. मात्र कल्याण डोंबिवली करांची खड्डयातून मुक्तता झालीच नाही. त्यामुळे यांचे असं झालं की, '' बडी बडी बाते... वडापाव खाते." !

Mumbai News
MNS Raj Thackeray : 'सध्याचं वातावरण बघता मी कुणाशी युती करेन असं वाटत नाही'; राज ठाकरेंचं विधान

अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. वाहतूक कोंडी मधून कल्याण डोंबिवलीकरांची सुटका करण्यासाठी नियुक्त केलेले वाहतूक पोलीस जर खड्डे बुजवून नागरिकांची सेवा करत असतील तर तो कोट्यवधी रुपयांचा निधी नक्की गेला कुठे ? सत्ताधारी आणि प्रशासनाला जे जमलं नाही ते वाहतूक पोलिसांनी करून दाखवण्यास सुरुवात केली आहे.त्यामुळे या वाहतुक पोलिसांचे कौतुक कराव तेवढं कमी आहे असे मनसेचे जिल्हा संघटक हर्षद पाटील यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com