esakal | धावत्या वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा दोनदा निसटला
sakal

बोलून बातमी शोधा

धावत्या वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा दोनदा निसटला

पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा निसटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, (ता.11) रोजी जोगेश्वरी आणि राम मंदिर घडली.

धावत्या वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा दोनदा निसटला

sakal_logo
By
कुलदीप घायवट

 
मुंबई  :  पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिनस-रामनगर एक्स्प्रेसचा एक डबा निसटल्याची धक्कादायक घटना गुरुवारी, (ता.11) रोजी जोगेश्वरी आणि राम मंदिर घडली. या डब्यात प्रवासी नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे उपनगरीय लोकल सेवेवर फटका बसला. धावत्या एक्स्प्रेसचा डबा दोनदा निसटल्याने प्रवासी सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. 

गुरुवारी, (ता.11) वांद्रे टर्मिनसहून रामनगरसाठी एक्स्प्रेस रवाना झाली. या एक्स्प्रेसला रिकामा डबा बंद करून जोडण्यात आला होता. पहाटे, 5.27 सुमारास जोगेश्वरी- राम मंदिर स्थानकादरम्यान गाडी धावत असताना मोठा आवाज झाला. एक्सप्रेसचे बंद असलेले शेवटचे दोन डबे निसटले. हे समजताच एक्सप्रेस थांबविण्यात आली. त्यानंतर घटनास्थळी रेल्वे अधिकारी आणि कर्मचारी पोहचले. सकाळी 6.40 वाजता हे डबे जोडून एक्सप्रेस रवाना करण्यात आली. मात्र, सकाळी 7.15 वाजता नायगाव-वसई रोड ला एक्सप्रेस पोहचताच पुन्हा डबा निसटले. शेवटी निसटलेले डबे बाजूला करत एक्स्प्रेस रवाना करण्यात आली, असे अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. या दुर्घटनेमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र लोकलच्या  गर्दीच्या वेळी हा प्रकार झाल्याने लोकल फेऱ्यावर परिणाम झाला. 

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

पश्चिम रेल्वेकडून या दुर्घटनेबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. डबे निसटले, डबे पूर्णपणे जोडल्याशिवाय गाडी रवाना कशी झाली ? एकदा दुर्घटना होऊन पुन्हा तीच दुर्घटना कशी झाली, एक्स्प्रेस रवाना होण्यापूर्वी याची तपासणी कोणत्या अधिकाऱ्यांने केली होती,  याची चौकशी होणार आहे. या चौकशीचा अहवाल पुढील तीन दिवसात सादर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या दुर्घटनेला दोषी असलेल्यांवर कारवाई केली जाईल, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

train marathi running Bandra Terminus Ramnagar Express escaped twice breaking news

loading image