
उल्हासनगर : सुरवातीची ऑफलाईन बांधकाम प्रस्तावाची प्रक्रिया बंद करण्यात आली असून आता ऑनलाइन प्रणाली अमलात आणली गेली आहे. मात्र त्यात तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्याने उल्हासनगर महानगरपालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक संचालक नगररचना ललित खोब्रागडे यांच्या पुढाकाराने ऑनलाइन बांधकाम प्रस्तावाचा मार्ग सुकर करण्यासाठी कार्यशाळा तसेच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात महाआयटी अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.