सर्वात मोठी बातमी - मंत्री आदित्य ठाकरेंच्या खात्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केल्यात महत्वाच्या बदल्या

सुमित बागुल
Friday, 17 July 2020

एकीकडे मुंबई पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचं नाव नाही. तर दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु असलेलं पाहायला मिळतंय.

मुंबई - एकीकडे मुंबई पुण्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचं नाव नाही. तर दुसरीकडे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण सुरुच असलेलं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसात ज्याप्रकारे राजकीय घटना घडल्यात, बैठका झाल्यात यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय हेच अधोरेखित होतंय.  

या पार्श्वभूमीवर आता बातमी येतेय ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याबाबत म्हणजेच अर्थात पर्यावरण मंत्रालयाबाबत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यात बदल्या झाल्यात. गेल्या काही दिवसात अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरूनही मोठ्या प्रमाणात राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळतंय. अशात आता आदित्य ठाकरेंच्याही खात्यात काही बदल्या झाल्याचं समोर येतंय. 

BIG NEWS - चहामध्ये गांडूळ तर जेवणात माशी; क्वारंटाईन सेंटरमधील गैरकारभार चव्हाट्यावर

नुकतीच बाळासाहेब थोरात यांनी देखील बदल्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर आता थेट आदित्य ठाकरे यांच्या खात्यात झालेल्या बदल्यांमुळे अनेकांच्या भुवयाही उंचवल्यात.    

अशा झाल्यात आदित्य ठाकरेंच्या खात्यात बदल्या : 

  • मनिषा पाटणकर-म्हैसकर यांची राज्य शिष्टाचार मंत्रालयाच्या प्रन्सीपल सेक्रेटरी आणि प्रमुख राज्य शिष्टाचार अधिकारी पदावरून पर्यटन मंत्रालयाच्या प्रिन्सीपल सेक्रेटरी पदावर बदली करण्यात आली आहे. 
  • मुंबई महापालिकेचे सहआयुक्त आशुतोष सलील यांची आदित्य ठाकरे यांच्या पर्यटन मंत्रालयाच्या MTDC च्या मँनेजिंग डायरेक्टर पदावर बदली करण्यात आलीये

मुंबईच्या सगळ्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा 

transfer of officers by CM uddhav thackeray in aaditya thackerays environment ministry


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: transfer of officers by CM uddhav thackeray in aaditya thackerays environment ministry