अत्यावश्यक सेवेसाठी दिलासा : मालवाहतुकीकरिता ई-पास

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याची परवनागी राज्य सरकारने दिली आहे. अशा वाहनांना पोलिसांच्या धर्तीवर पास (क्यूआर कोड) उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहे

कल्याण : अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना आता कल्याण आरटीओमार्फत ई-पास देण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी (ता. 4) 53 परवाने देण्यात आल्याची माहिती कल्याण आरटीओने दिली.

हे वाचलं का? : मुंबईत संकटकाळात ग्राहकांची लूटमार

लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याची परवनागी राज्य सरकारने दिली आहे. अशा वाहनांना पोलिसांच्या धर्तीवर पास (क्यूआर कोड) उपलब्ध करून देण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले होते. त्या धर्तीवर कल्याण आरटीओने शनिवारपासून पास देण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी 53 जणांना पास देण्यात आले आहेत. यापूर्वी कल्याण आरटीओमार्फत 26 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत 176 पास देण्यात आले. 

हेही वाचा : नवी मुंबईत कोरोना जनजागृतीसाठी इंटरनेट रेडिओ

पास स्थानिक पातळीवर प्रतिदिन वाहतूक करणाऱ्यासाठी नसून अन्य शहरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी वा व्यापारी आपल्या फळ भाज्या, धान्य, कोंबड्या आणि शेतीसाठी लागणारे साहित्य आणि वस्तू मोठ्या प्रमाणात वाहतूक करतात अशांसाठी असल्याची माहिती आरटीओमधून देण्यात आली.

अर्ज कसे भराल?
https://transport.maharashta.gov.in साईटला भेट द्या. Apply for e pass goods vehicle select करावे. RTO where to apply ठिकाणी MH05 (KALYAN) सिलेक्ट करावे. वाहनमालकाचे नाव नोंदवावे. वाहनचालकाचे (driver) नाव नोंदवावे. वाहनचालकाचा वैध licence क्रमांक नोंदवावा. वैध मोबाईल क्रमांक नोंदवावा (चालकमालक) व ई-मेल आयडी नोंदवावा. वाहन क्रमांक नोंदवावा. वाहनाचे चेसिस क्रमांक शेवटचे 5 आकडे. वाहनाचा प्रकार नोंदवावा. कोणत्या प्रकारचे माल वाहून नेणार आहे ते नोंदवावे (उदा. Vegetable /grain/groceries ). माल वाहून नेण्यासाठी मार्ग नमूद करावा (उदा. ठाणे ते मुंबई ) ई पास कालावधी नमूद करावा. एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी नसावा (दिलेल्या तारखेमधून निवडावा) Word verification character भरून अॅप्लिकेशन सबमिट करावे. पाससाठी application reference number generate होईल. उपरोक्त अॅप्लिकेशन क्रमांकानुसार RTO ऑफिसने approval केल्यानंतर आपल्या वाहनाचा ई पास generate होईल व तो PDF स्वरूपात अर्जदाराच्या mail-id वर पाठवण्यात येईल किंवा अर्जदारास प्रिंट घेता येईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The transport commissioner's office has ordered that transport essential goods vehicles be provided with a pass