नवी मुंबईत कोरोना जनजागृतीसाठी इंटरनेट रेडिओ

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

राज्यभरात फोफावत असलेल्या कोराना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने इंटरनेट रेडिओ सुरू केला आहे. सोमवारी (ता. 6) दुपारी 12 वाजता रेडिओ स्टेशनवरून `स्वच्छ रेडीओ नवी मुंबई` हा कार्यक्रम प्रसारित करून जनजागृतीचा शुभारंभ होणार आहे. कोरानाची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी याकरिता महापालिकेने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जनजागृतीसाठी इंटरनेट रेडिओचा वापर करणारी नवी मुंबई ही राज्यातली पहिली महापालिका ठरल्याचा दावा केला जात आहे. 

नवी मुंबई : राज्यभरात फोफावत असलेल्या कोराना विषाणूबाबत जनजागृती करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने इंटरनेट रेडिओ सुरू केला आहे. सोमवारी (ता. 6) दुपारी 12 वाजता रेडिओ स्टेशनवरून `स्वच्छ रेडीओ नवी मुंबई` हा कार्यक्रम प्रसारित करून जनजागृतीचा शुभारंभ होणार आहे. कोरानाची लक्षणे आणि उपाययोजना याबाबत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत माहिती पोहोचावी याकरिता महापालिकेने हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. जनजागृतीसाठी इंटरनेट रेडिओचा वापर करणारी नवी मुंबई ही राज्यातली पहिली महापालिका ठरल्याचा दावा केला जात आहे. 

विनाकारण बाहेर पडणे महागात, पोलिसांनी वाहनेही केली जप्त  

राज्यासह नवी मुंबई शहरातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. शहरात सध्या कोरोनाबाधित 25 रुग्ण सापडले आहेत. नेरूळ, सिवूड्स, वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली या भागात हे रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांमुळे तब्बल एक हजारपेक्षा जास्त नागरिकांना घरातच क्वारंटाईन करण्यात आले आहेत. तर काहींना विशेष विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. कोरोनावर थेट उपचार नसल्यामुळे खबरदारी हाच उपचार ठरवून महापालिकेने जनजागृतीसाठी रेडिओसारख्या प्रभावी माध्यमाचा वापर सुरू केला आहे. 
   
  `स्वच्छ रेडिओ नवी मुंबई` सध्या दिवसातून दोन वेळा नागरिकांसाठी लाईव्ह करण्यात येणार आहे. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 6.30 वाजेपर्यंत याचे प्रसारण होणार आहे. याकरिता नागरिकांना www.swachhradionavimumbai.com या संकेतस्थळावर जाऊन `स्वच्छ रेडिओ नवी मुंबई`ची लिंक डाऊनलोड करावी लागणार आहे. काही दिवसातच याबाबतचे अॅप नागरिकांना गुगल प्ले स्टोअरवर देखील उपलब्ध होणार आहे. 

...अन् बदलापूरकरांचा जीव भांड्यात पडला

 महापालिकेच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षामार्फत ग्लोबल ग्रीन इनोव्हेटर्स प्रा. लि. यांच्या कल्पक योजनांमधून हा इंटरनेट रेडिओ सुरू करण्यात आला आहे. या रेडिओवरील कार्यक्रमांत कोरोनाबाबत घ्यावयाच्या उपाययोजना, कोरानाची लक्षणे, आजाराबाबात समज-गैरसमज दूर करण्यासाठी कार्यक्रम राबवले जाणार आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारतर्फे जाहीर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देखील या रेडिओवरून देण्यात येणार आहे. तसेच यापुढेही स्वच्छता अभियान राबवण्यासाठी या रेडिओचा वापर केला जाणार आहे. 

स्वच्छ रेडिओ नवी मुंबई` हा समस्त नवी मुंबईकरांना समर्पित केलेला उपक्रम आहे. संचारबंदीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या घरात थांबून आपले योगदान द्यावे.
- अण्णासाहेब मिसाळ, 
आयुक्त, नवी मुंबई महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Internet Radio for Corona awareness in New Mumbai