
ठाणे : ठाणे पूर्व परिसराची वाहतूकीच्या कोंडमाऱ्यातून सुटका करण्यासाठी बांधण्यात आलेल्या सॅटिस -2 पुलासाठी बांधण्यात आलेल्या पिलरवर गर्डर बसवण्याच्या कामासाठी कोपरी रेल्वे पूल वाहतूकीकरिता नऊ दिवस बंद ठेवला जाणार आहे. या ठिकाणी वाहतूक विभागाने तब्ब्ल 143 तासांचा मेगा ब्लॉक घेतला असून या काळात ठाणे रेल्वे स्थानकासह पूर्व परिसराला वाहतूक कोंडीचे ग्रहण लागणार आहे.