
डोंबिवली : डोंबिवलीहून कल्याण, ठाकुर्ली दिशेने जाणारी वाहने चोळेगाव मार्गे म्हसोबा चौकातून 90 फिट रोडवर जातात. चोळेगावातील हनुमान मंदिर जवळील रस्ता हा अरुंद असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहन कोंडी होते. ही वाहन कोंडी फोडण्यासाठी येथील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहतूक विभागाने तशी सूचना जारी केली आहे.