
मुंबई : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे बंद करण्याचा धक्कादायक निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मात्र, वाढती प्रवासी संख्या पाहता स्थानिकांना जवळ रोजगार उपलब्ध करून देणे, रेल्वेने फेऱ्या वाढवणे अपेक्षित असून लोकलचे बंद दरवाजा करण्याचा निर्णय चुकीचा ठरेल, असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.