एसटीच्या प्रगतीसाठी दिवाकर रावते यांचे कामगार संघटनांना साकडे

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

आज मंत्र्यालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिवाकर रावते यांनी आमंत्रित केले. कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार केला.

मुंबई : तोट्यात असलेल्या एसटीला नफ्यात आणण्यासाठी सहकार्य करण्याचे साकडे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगार संघटना घातले. वेतनवाढी वरून कामगार संघटना व व्यवस्थापनामध्ये वाढत असलेला तेढ लक्षात घेऊन दिवाकर रावते यांनी कामगार संघटना व व्यवस्थापनाचे मनोमिलन घडवून आणले. 

आज मंत्र्यालयातील आपल्या दालनात एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिवाकर रावते यांनी आमंत्रित केले. कामगार संघटना अध्यक्ष संदीप शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार केला. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या रावते यांनी जाणून घेतल्या. वेतनवाढीत सन 2009 मध्ये एसटीत रूजू झालेल्या कामगारांना अनावधानाने राहून गेलेल्या चार वेतनवाढ देण्याचे आदेश रावते यांनी दिले.

नुकत्याच झालेल्या पगारवाढी संदर्भात एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमके प्रतिक्रिया काय व उत्पन्नवाढीच्या संदर्भात नेमकं काय करता येईल, याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेतले. संस्थेकडून नवनवीन योजना व आर्थिक लाभ सुरू राहण्यासाठी संस्थेची प्रगती होणे आवश्यक असते, त्या दृष्टीने कोणतेही राजकारण आडवे येऊ न देता सर्वांनी महामंडळाच्या प्रगतीस हातभार लावावा, असे प्रतिपादन मा. रावते यांनी केले.
   
केरळ पुराग्रस्तांना मदत -
केरळ पूरग्रस्तांसाठी एसटीकडून दहा कोटी रुपये मदत देण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांकडून अर्ध्याच दिवसाचा पगार देण्याची व त्यात प्रशासनाने अर्धी रक्कम पुराग्रस्तांना दान देण्यात आली आहे.

 

Web Title: Transport Minister Diwakar Raote requested for help the ST loss