pratap sarnaik
sakal
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेसाठी काँग्रेस व शिवसेनेची युती झाली असल्याचा आरोप शनिवारी (ता. ३) भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपची एमआयएमशी युती झाली असल्याचा आरोप परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. भाजपकडून एमआयएमच्या उमेदवारांना आर्थिक रसदही पुरवली जात असल्याचे सरनाईक यांनी रविवारी (ता. ४) सांगितले.