

Pratap Sarnaik On Transporters Strike
ESakal
मुंबई : वाहतूकदार संघटनांनी ई-चलान आणि इतर मागण्यांसाठी नियोजित राज्यव्यापी संप ५ मार्चपासून घोषित केला होता. आखाती युद्धामुळे मालवाहतूक निर्यात विस्कळित झाली आहे. संप झाल्यास वाहतूक व्यवस्थेला फटका बसू शकतो. त्यामुळे संप स्थगित करण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत वाहतूकदारांनी संप स्थगित केला.