प्रवासी एसटीचे दैवत ; ST महामंडळ मारहाणीचे समर्थन करणार नाही

एसटी महामंडळाची ट्विटरवरुन दिलगिरी व्यक्त
ST bus
ST bussakal media

मुंबई : वृद्ध दाम्पत्याने (old age couple) बस हळू चालवा असं म्हटल्यानंतर राग मनात धरून त्यांना मारहाण करणाऱ्या एसटीच्या चालक (ST driver), वाहकाला एसटी महामंडळ प्रशासनाने (ST bus authorities) तडकाफडकी निलंबित केले आहे. प्रवासी एसटीचे दैवत आहे. त्यामुळे अशा मारहाणीचे समर्थन केले जाणार नसल्याचे एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar channe) यांच्या नावाचे ट्विट एसटी महामंडळाने अधिकृत ट्विटर हँडलवरून (ST twitter handle) प्रसारित करत दिलगिरी व्यक्त केली आहे. ( travelers are like god ST bus authorizes don't support inhuman activities of bus depot-nss91)

शुक्रवारी वाडा एसटी बस स्थानकात ही घटना घडली, बोईसर आगारातील बस बोईसर ते पैठण फेरीसाठी प्रवास सुरु होता. दरम्यान जनार्दन सदू पाटील (वय 65) आणि त्यांची पत्नी यादरम्यान प्रवासात होती. चालक वेगाने गाडी चालवत असल्याने पाटील यांनी बस हळू चालवण्यास सांगितले, मात्र त्याचा राग मनात धरून बस वाडा बस स्थानकात पोहचताच चालक, वाहकांनी त्या वृद्ध दाम्पत्यांना मारहाण केली. दरम्यान काहीच वेळात समाजमाध्यमांवर यासंदर्भातील व्हिडीओ सुद्धा व्हायरल झाला होता.त्यानंतर आता एसटी महामंडळाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून दिलगिरीव्यक्त केली आहे।

ट्विटरवरील एसटी महामंडळाचे स्पष्टीकरण

वाडा येथील एसटी स्थानकात एका दाम्पत्याला एसटीच्या चालक व वाहकांकडून झालेल्या मारहाणीची घटना दुर्दैवी आहे. प्रवासी हे एसटीचे दैवत आहेत. त्यामुळे प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून झालेल्या मारहाणीचे एसटी महामंडळ कदापि समर्थन करणार नाही. या घटनेबद्दल एसटी महामंडळ दिलगिरी व्यक्त करीत आहे. महामंडळाने या घटनेची दखल घेत संबंधित चालक-वाहक यांना तातडीने सेवेतून निलंबित केले आहे. तथापि, या घटनेची उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात येईल.

चौकशीत दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल.

- शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com