'कैद्यांबरोबर मानुसकीने वागा'; उच्च न्यायालयाचा कारगृह प्रशासनाला सूचक सल्ला

सुनिता महामुणकर
Tuesday, 8 December 2020

कारागृहात असलेल्या बंद्यांबरोबर माणुसकिने वागा, असा सूचक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिला आहे.

मुंबई : कारागृहात असलेल्या बंद्यांबरोबर माणुसकिने वागा, असा सूचक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने कारागृह प्रशासनाला दिला आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संवेदनशील करण्यासाठी कार्यशाळेची गरज आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.

हेही वाचा - कोरोना विरोधातील लढाई अंतिम टप्प्यात! परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाची तपासणी होणार

भीमा कोरेगाव हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात अटकेत असलेले विचारवंत गौतम नवलखा यांचा चष्मा तळोजा कारागृहात चोरीला गेला आहे. यामुळे त्यांना सध्या दिसण्यासाठी अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी कुरिअरने नवीन चष्मा पाठविला होता. मात्र हा चष्मा कारागृहातील अधिकार्यानी स्विकारला नाही आणि परत पाठवून दिला. न्या एस एस शिंदे आणि न्या एम एस कर्णिक यांच्या खंडपीठाने या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली. पोलिसांना माणुसकिचे धडे देण्यासाठी आणि संवेदनशील होण्यासाठी कार्यशाळा घेण्याची गरज आहे, असे मत न्यायालयाने व्यक्त केले. कारागृहातील बंद्याना एवढ्या लहान वस्तुपण नाकारणार का, त्यांच्याकडे मानवीय द्रुष्टीने बघत जा, अशा शब्दांत खंडपीठाने नाराजी व्यक्त केली.

चष्मा नसल्यामुळे नवलखा यांना काही दिसत नाही, त्यामुळे त्यांना दोन आठवड्यापासून खूप त्रास सहन करावा लागत आहे. याचा परिणाम म्हणून त्यांचा रक्तदाबही वाढतो, असे त्यांच्या पत्नीने न्यायालयात केलेल्या अर्जात लिहिले आहे.

हेही वाचा - चर्चा तर होणारच ! पालघरच्या समुद्रात मासेमाऱ्यांना आढळला उडणारा दुर्मिळ मासा

एनआयएने अटक केलेल्या रमेश गायचोर आणि सागर गोर्खे यांनी न्यायालयात याचिका केली आहे. या दोघांनी अन्य आरोपींबाबत दंडाधिकारी न्यायालयात जबाब दिला नाही म्हणून त्यांना अटक केली आहे, असा युक्तिवाद एड मिहीर देसाई यांनी केला. तसेच पुण्यात याबाबत गुन्हा दाखल असताना आणि विशेष न्यायालय तेथे असतानाही मुंबईमध्ये सुनावणी घेतली जाते, असेही देसाई यांनी मांडले.

याबाबत बाजू मांडण्यासाठी एनआयएच्या वतीने अवधी मागण्यात आला. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी ता. 21 पर्यंत तहकूब केली.  नवलखा एप्रिलपासून कारागृहात आहेत.

Treat prisoners humanely The High Courts suggestive advice

---------------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treat prisoners humanely The High Courts suggestive advice