ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचे उपचार जिल्ह्यातच होणार

सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 एप्रिल 2020

  • प्रत्येक महापालिका क्षेत्रात कोविड 19 रुग्णालय;
  • जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची माहिती

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभुमिवर जिल्हा सामान्य रुग्णालयात कोविड 19 वर उपचार सुरु झाले असून, प्रत्येक महापालिका स्तरावर देखील कोविड 19 रुग्णालय सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित अथवा संशयित रुग्णाला उपचारासाठी मुंबईला जावे लागणार नाही. जिल्ह्यातच त्यांना उपचार मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.मुंबईतील

महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

 ठाणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती लक्षात घेवून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय कोविड 19 घोषित करण्यात आले आहे. त्या ठिकाणी आता रुग्णांवर उपचार देखील करण्यात येत आहेत. त्यात जिल्ह्यातील ठाणे, कल्याण –डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोना संशयितांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आले आहे. 

रविवार पर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी नव्वदी पार केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचे संकट अधिक गडद होत आहे. या वाढत्या आकडेवारीची गांभीर्याने दखल घेत, जिल्हा प्रशासनाने प्रत्येक महापालिका क्षेत्रात कोविड 19 रूग्णालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार येत्या काही दिवसात प्रत्येक महापालिका क्षेत्रात कोविड 19 रुग्णालय येत्या काही दिवसातच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली. 

अधिक बातम्यांसाठी "ईपेपर" वाचा।

कोरोनाचा प्रादुर्भाव टळणार
पालिकाक्षेत्रात देखील कोविड 19 रुग्णालय झाल्यास जिल्ह्यातील कोरोना संशयित व बाधित रुग्णांना तिथल्या तिथेच उपचार मिळण्यास सुलभता होणार आहे. तसेच त्यांना मुंबईला जाण्याची आवश्यकता भासणार नसून त्यांना ने-आण करतांना होणारा प्रादुर्भावाचा देखील धोका टळणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Treatment of coronary artery in Thane district will be treated only in the district