मुंबई महापालिकेत तिरंगी लढत होणार, भाजप वाढवणार शिवसेनेची अडचण ?  

समीर सुर्वे
Wednesday, 30 September 2020

निवडणुक तिरंगी झाल्यास शिवसेनेचा विजय निश्चित आहे. मात्र, भाजपने आयत्यावेळी कॉग्रेसला पाठींबा दिल्यास शिवसेनेटीची अडचण होऊ शकते.

मुंबई, ता.30: मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष पदासाठी शिवसेना,भाजप आणि कॉग्रेसच्या उमेदवारानी अर्ज दाखल केले आहेत. ही निवडणुक तिरंगी झाल्यास शिवसेनेचा विजय सोपा मानला जात आहे. भाजप पहिल्यांदाच निवडणुक लढवत असून पहिल्यांदाच निवडणुक तिरंगी होत आहे.

शिवसेनेने यशवंत जाधव यांना सलग तिसऱ्यांदा स्थायी समितीवर संधी दिली आहे. तर, शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून संध्या दोषी यांनी अर्ज दाखल केला आहे. तर, भाजपकडून स्थायी समितीसाठी ऍडव्होकेट मकरंद नार्वेकर आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी सुरेखा पाटील यांनी अर्ज दाखल केला. तर कॉग्रेसकडून स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी आसिफ झकेरीया आणि शिक्षण समितीसाठी संगिता हांडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

महत्त्वाची बातमी : पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी
 

ही निवडणुक तिरंगी झाल्यास शिवसेनेचा विजय निश्चित आहे. मात्र, भाजपने आयत्यावेळी कॉग्रेसला पाठींबा दिल्यास शिवसेनेची अडचण होऊ शकते.

शिक्षण समितीतील संख्याबळ 

 • शिवसेना - 13 - (2 स्विकृत सदस्य)  
 • भाजप - 10-(1 स्विकृत सदस्य) 
 • कॉग्रेस - 4 
 • राष्ट्रवादी कॉग्रेस - 1 
 • समाजवादी पक्ष - 1 

स्थायी समिती सदस्य 

 • शिवसेना - 11 
 • भाजप - 10 ( स्विकृत नगरसेवक सदस्य असल्याने 1 मत कमी)  
 • कॉग्रेस - 3 
 • राष्ट्रवादी कॉग्रेस - 1 
 • समाजवादी काँग्रेस पक्ष - 1 
 • शिक्षण समिती अध्यक्ष - पदसिध्द सदस्य 

( संपादन - सुमित बागुल )

triangular elections in bruhanmumbai municipal corporation standing committee election


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: triangular elections in bruhanmumbai municipal corporation standing committee election