esakal | पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी
sakal

बोलून बातमी शोधा

पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी

पन्नास टक्के क्षमतेने ही आस्थापाने सुरु होणार आहेत. येत्या पाच तारखेपासून महाराष्ट्र राज्य सरकारने हॉटेल्स, बार्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्यास आता परवानगी दिलेली आहे

पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार होणार सुरु, डब्बेवाल्यांनाही लोकलमधून प्रवासास परवानगी

sakal_logo
By
सुमित बागुल

मुंबई : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणार आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने अनलॉक पाच संदर्भात नियमावली जाहीर केलीये. या नव्या नियमावलीप्रमाणे आता राज्यातील रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु होणार आहेत.

पन्नास टक्के क्षमतेने ही आस्थापाने सुरु होणार आहेत. येत्या पाच तारखेपासून महाराष्ट्र राज्य सरकारने हॉटेल्स, बार्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्यास आता परवानगी दिलेली आहे. गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लॉकडाउनचा मोठा आर्थिक फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. अशात अनलॉककडे वाटचाल करत असताना हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार्स अद्यापही सुरु करण्यात आलेले नव्हते. मात्र आज जारी करण्यात आलेल्या नव्या नियमावलीप्रमाणे आता बंद असलेलं होटल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणार आहेत. पाच तारखेपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार सुरु होतील.

महत्त्वाची बातमी : महाविकास आघाडीतीलच पक्षाची आदित्य ठाकरेंविरोधात घोषणाबाजी, मंत्रालयाच्या गेटवर आंदोलन

या सोबतच मुंबईतील लोकल ट्रेनच्या फेऱ्या वाढवल्या गेल्यात, महाराष्ट्र राज्यांतर्गत चालवली जाणारी रेल्वे सेवा सुरु केली जाणार आहे. पुणे विभागातील ट्रेन्सलादेखील परवानगी देण्यात आलेली आहे.  

डबेवाल्यां​च्या मागणीस यश :
आज राज्य सरकारने जी नवीन नियमावली जारी केलीये, त्या नियमावलीनुसार मुंबईतील डबेवाल्यांचा लोकल प्रवासाचा प्रश्न मार्गी निघालाय. मुंबईतील डबेवाल्यांना ट्रेनमधून प्रवास करण्यात मुभा देण्यात आलेली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून डबेवाल्यांनाकडून लोकल ट्रेनमधून प्रवासाची मागणी होत होती. या मागणीला आता अखेर यश आलेलं आहे.   

unlock five permits hotels restaurants and bars to reopen by state government

loading image
go to top