

Tribal Vendors Livelihoods in dangered
ESakal
नितीन बिनेकर
मुंबई : मुंबई लोकलमध्ये कंत्राटी फेरीवाल्यांची नियुक्ती करण्याच्या मध्य रेल्वेच्या निर्णयामुळे केवळ प्रवासी सुरक्षेचाच प्रश्न निर्माण झालेला नाही, तर अनेक दशकांपासून मुंबईकरांच्या चवीचा भाग बनलेला जंगलातील करवंद, जांभूळ आणि रानमेवा विकणाऱ्या आदिवासी विक्रेत्यांच्या उपजीविकेवरही गदा येण्याची भीती व्यक्त होत आहे. कसारा, कर्जत, इगतपुरी, पालघर या आदिवासी पट्ट्यातील अनेक कुटुंबे लोकल आणि मेल गाड्यांमध्ये हंगामी फळे विकून आपला संसार चालवतात. मात्र आता अधिकृत कंत्राटी विक्रेत्यांच्या स्पर्धेत हे पारंपरिक विक्रेते मागे पडण्याची शक्यता आहे.