esakal | गलवान खोऱ्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा 'असाही' सन्मान
sakal

बोलून बातमी शोधा

गलवान खोऱ्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा 'असाही' सन्मान

गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर लढताना शूर जवानांनी आपले बलिदान दिले. अशात आता भारताचा स्वातंत्र्य दिनही काही दिवसांवर आलाय.

गलवान खोऱ्यातील शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा 'असाही' सन्मान

sakal_logo
By
विनोद राऊत

मुंबई : गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर लढताना शूर जवानांनी आपले बलिदान दिले. अशात आता भारताचा स्वातंत्र्य दिनही काही दिवसांवर आलाय. भारताच्या 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर  देशातील विविध ठिकाणी गलवान खोऱ्यातील शूर जवानांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक उपक्रम राबवले जातायत. . 

अशाच प्रकारचा एक खास जवानासाठीचा आणि त्यांच्या कुटुंबियांसाठीचा एक उपक्रम  नुकताच पार पडला. पीएनबीने हा उपक्रम घेतला होता. PNB ने उपक्रमाअंतर्गत शहीद जवानांच्या कुटुंबीयांना त्यांच्या देशसेवेतील योगदानाबद्दल स्मृतीचिन्ह देऊन गौरव केला. पंजाब नॅशनल बँकेचे वरिष्ट अधिकारी या अमर जवानांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. भारतीय शूर जवानांनी गलवान खोऱ्यात देशाचं रक्षण करताना आपल्या जीवाची बाजी लावत देशासाठी प्राण दिलेत. याप्रसंगी PNB तर्फे जवानांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं गेलं.  

हेही वाचा : मुंबईत 1,000,70 रुग्ण कोरोनामुक्त... जाणून घ्या आज दिवसभरातील नव्या रुग्णांची आकडेवारी

भारतासाठी लढणाऱ्या या हुतात्म्यांच्या बलिदानाची आम्हाला कायम आठवण राहील आणि या दुःखद प्रसंगी शहीद जवानांच्या कुटुंबीयांसमवेत आम्ही आहोत अशी भावना व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गत जवानांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत दिली जाईल असं आश्वासन देखील देण्यात आलं. 

( संपादन - सुमित बागुल ) 

tribute to soldiers who lost their life at galwan valley while fighting against china

loading image