टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून एखाद्याला ट्रोल करणं सुसंस्कृत समाजासाठी चांगले नाही : सुप्रिया सुळे

दीपा कदम
Monday, 12 October 2020

सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं, ट्रोल करणे, एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यासाठी टेक्नॉलॉजीचा  गैरवापर केला गेला. हे सुसंस्कृत समाजासाठी , देशासाठी चांगलं नाही

मुंबई - कोरोना संकटकाळात टेक्नॉलॉजी मदतीला आली परंतु याच टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून सोशल मिडियावर एखाद्याला शिवीगाळ करणं, ट्रोल करणे, एखाद्याच्या खाजगी आयुष्यात डोकावण्यासाठी टेक्नॉलॉजीचा  गैरवापर केला गेला. हे सुसंस्कृत समाजासाठी , देशासाठी चांगलं नाही त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. डोंबिवलीतील इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांशी त्यांनी झूमद्वारे संवाद साधला.

माध़्यमांचे स्वातंत्र्य मान्यच आहे, मात्र शिवीगाळ होणार असेल तर मात्र आवाज उठवला गेला पाहिजे असेही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले. 

मुंबईचं फुप्फुस वाचल्याचा आनंद! कांजूर कारशेडच्या निर्णयाचे पर्यावरणवाद्यांकडून स्वागत

डोंबिवली येथील जोंधळे इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण आणि येणारं शैक्षणिक धोरण याबद्दल काय वाटते व टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया आणि न्यूज यामध्ये पुढे काय धोरण असले पाहिजे, सेक्स एज्युकेशन यासह अन्य विषयांवर झूमद्वारे सुप्रिया सुळे यांनी  संवाद साधला.

अंमली पदार्थांबाबत बोलताना ड्रग्ज घेणं थांबवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. मुलं का ड्रग्ज घेत आहेत यावर विचार व्हायला पाहिजे. अभिनेत्रींच्या गाडीचा पाठलाग करण्यापासून तिने घातलेले कोणते कपडे घातलेत हे दाखवले जाते. एखाद्याच्या खाजगी आयुष्यात घुसून दाखवलं जातं हे ऐकायला मला आवडत नाही.  हे मुलांना तरी आवडतं का? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी मुलांना केला.

इलेक्‍ट्रॉनिक मीडियावर अंकुश का नाही? उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला सवाल

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी बजाजचे मॅनेजिंग डायरेक्टर राजीव बजाज यांनी अफवा पसरवण्यासाठी ज्या एजन्सी किंवा वृत्तपत्र आणि चॅनल काम करत आहेत त्यांना जाहीरात न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले. 

या संवादात विद्यार्थी प्रणय काते, पुनम निमजे, अर्चित पुरंदरे, निखिल बागुळ यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव जोंधळे यांनी सहभाग होत आपले विचार मांडले.

---------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trolling someone through technology is not good for civilized society Supriya Sule