27 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला गुजरात मधून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Crime News : 27 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला गुजरात मधून अटक

मुंबई - लग्नाच्या बहाण्याने वरळी येथील तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी ट्रक चालकाला गुजरातमधील भरूच येथून अटक करण्यात आली आहे. आरोपी आणि पीडित तरुणी गेल्या वर्षी मार्चपासून डेटिंग अॅपच्या माध्यमातून संपर्कात होते. ट्रकचालकाने दोन वेळा मुंबईला भेट देऊन वरळीतील एका गेस्टहाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार केला.'

जेव्हा 27 वर्षीय महिला गर्भवती राहिली आणि मे महिन्यात सायन रुग्णालयात तिला प्रसूती झाली तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्या महिलेने मुलाच्या वडिलांबद्दल समाधानकारक उत्तरे न दिल्याने तेथील डॉक्टरांनी सतर्क केले होते,त्यानंतर वरळी येथील रहिवाशांनी भोईवाडा पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

बलात्काराचा गुन्हा दाखल के ल्यानंतर तपासात असे आढळून आले की आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिचे फोन घेणे बंद केले होते. भोईवाडा पोलीसानी एक टीम वापीला पाठवली पण तो पळून जाण्यात यशस्वी झाला. नंतर, गुप्तचरांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी भरूचमध्ये पकडण्यात आले.