धाकट्या बहिणीला पैशांसाठी विकण्याचा प्रयत्न; थोरल्या बहिणीकडून नात्याला काळीमा
मुंबई ः नात्याला काळीमा फासणारी घटना मुंबईतील मानुखुर्द परिसरात घडली आहे. अवघ्या दोन लाख रुपयांसाठी थोरल्या बहिणीनेच अल्पवयीन बहिणीचा विवाह 49 वर्षीय व्यक्तीशी ठरवला. मात्र, वेळीच ही घटना मुलीच्या आईला समजल्यामुळे हा प्रकार रोखण्यात आला. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी पीडित मुलीची मोठी बहिण, बहिणीचा पती आणि ज्या 49 वर्षीय व्यक्तीसोबत मुलीचे लग्न करण्यात येणार होते, त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली आहे.
मानखुर्द परिसरात पीडित 16 वर्षीय मुलगी तिच्या 25 वर्षीय मोठी बहिण आणि भावोजींसोबत रहात होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच परिसरात राहणारा आरोपी 49 वर्षीय पीडितेच्या मोठ्या बहिणीला आणि भावोजींना बाजारात भेटला, त्याचा भाजीविक्रीचा व्यवसाय आहे. त्या भेटी दरम्यान त्याने दोघांना आपण लग्नासाठी एक लहान मुलीच्या शोधात असल्याचे सांगितले. तसेच जो आपल्याला त्याची लहान मुलगी देईल, त्या मुलीच्या घरातल्यांना आपण 2 लाख रुपयेही देऊ असे सांगितले. हे एकूण पीडित मुलीची मोठी बहिण आणि तिच्या नवऱ्याच्या मनात लालसा निर्माण झाली. या पैशाच्या हव्यासातून त्या दोघांनी अल्पवयीन पीडित मुलीचा व्यवहार तिच्या आणि तिच्या आईच्या नकळत ठरवला.
व्यापाऱ्यानेही मुलीला पाहण्याच्या नावाखाली पीडितेच्या मोठ्या बहिणीला तिला घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार 2 ऑगस्टला पीडित मुलीची मोठी बहिण पीडित मुलीला घेऊन व्यापाऱ्याने बोलवलेल्या ठिकाणी गेली. त्यावेळी मुलीशी एकांतात गप्पा मारण्याच्या नावाखाली तो तिला एका खोलीत घेऊन गेला. त्यावेळी त्याने तिच्यावर अत्याचार केले. वेदनेनं असह्य झालेल्या पीडित मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती कशीबशी आईपर्यंत पोहचवली. या घटनेनंतर पीडितमुलीच्या आईने मानुखुर्द पोलिसात तिची मोठी मुलगी, जावई आणि अत्याचार करणाऱ्या त्या भाजीविक्रेत्यावर नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात कलम 376, 366(अ),370, 323, सह बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 6आणि 17 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी तिघांना अटक केली आहे
--------------------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.