

FDA Raid On Frooti, zepto, instamart
ESakal
मुंबई : ऑनलाइन माध्यमातून अन्नपदार्थांची विक्री व वितरण करणाऱ्या 'ब्लिंकिट', 'झेप्टो', 'इन्स्टामार्ट' आदी आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर विशेष तपासणी मोहीम राबविली. १३ ऑगस्ट रोजी झालेल्या या मोहिमेत ८६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ६० आस्थापनांना सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या असून १४ अन्न व्यवसाय परवाने निलंबित करण्यात आले. एका आस्थापनेची व्यावसायिक कार्यवाही तात्पुरती थांबविण्याचे निर्देश देण्यात आले.