FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

FDA Raid On Edible Oil: एफडीएने खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे.
FDA

FDA

ESakal

Updated on: 

मुंबई : खाद्यतेलाच्या साठवणुकीपासून पॅकिंगपर्यंतच्या प्रक्रियेत अन्नसुरक्षा नियमांचे पालन होत आहे की नाही, याबाबत तपासणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुणे विभागात व्यापक मोहीम हाती घेतली आहे. पुणे, सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांतील २५ आस्थापनांची तपासणी करीत प्रशासनाने एक कोटी २८ लाख ७३ हजार रुपये किमतीचे एकूण ७४ हजार ६१२ किलो खाद्यतेल जप्त केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com