

Tukaram Mundhe
Esakal
राज्यात धडाकेबाज कारवायांसाठी ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तथा अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अन्न व औषध प्रशासनाने राज्यभरात सातत्याने केलेल्या कारवायांमुळे अन्न माफियांवर मोठा आळा बसल्याचे चित्र दिसत आहे. छोट्या खाद्यव्यवसायांपासून मोठ्या हॉटेल्सपर्यंत कारवाईचा धडाका सुरू असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॅन्टीनवरही एफडीएने कारवाई केली आहे.