FDA Action: 'एफडीए'चा बडगा! औषधांच्या गुणवत्तेत त्रुटी, विनापरवानाविरोधात कारवाई

FDA Action On Defects in Medicines Quality: औषधांच्या गुणवत्तेत त्रुटी आणि विनापरवाना विक्रीविरोधात एफडीएने कारवाईचा बडगा उगारला आहे.
FDA

FDA

ESakal

Updated on: 

मुंबई : औषधांच्या गुणवत्तेतील त्रुटी आणि विनापरवाना उत्पादनाविरोधात अन्न व औषध प्रशासनाच्या औषध विभागाने धडक कारवाई केली आहे. ५ ते १७ऑक्टोबरदरम्यान राज्यातील सातही विभागांत ९३७ तपासण्या करून ४५० नोटिसा बजावण्यात आल्या, या मोहिमेत २९ परवाने रद्द, तर ७१ परवाने निलंबित करण्यात आले. प्रयोगशाळांमध्ये तपासलेल्या २७९ औषध नमुन्यांपैकी २१ नमुने गुणवत्तेच्या निकषांवर अपयशी ठरले. विनापरवाना औषधविक्री आणि सौंदर्यप्रसाधनांच्या उत्पादनाविरोधातील पाच कारवायांत २८ लाख ५२ हजार ३०४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com