esakal | 43 वर्षीय व्यक्तीच्या अन्ननलिकेतून काढला 8 सेंटिमीटरचा ट्यूमर
sakal

बोलून बातमी शोधा

43 वर्षीय व्यक्तीच्या अन्ननलिकेतून काढला 8 सेंटिमीटरचा ट्यूमर

रूग्णाचा भाऊ तारिक खान म्हणाले की, जेव्हा भावाच्या अन्ननलिकेत ट्यूमर असल्याचे निदान झाले तेव्हा आम्ही खूप घाबरून गेलो होतो.

43 वर्षीय व्यक्तीच्या अन्ननलिकेतून काढला 8 सेंटिमीटरचा ट्यूमर

sakal_logo
By
भाग्यश्री भुवड

मुंबई : उत्तरप्रदेशातील अल्मागडमध्ये राहणारे मोहम्मद असिफ खान हे व्यावसायिक आहेत. त्यांना जेवताना त्रास जाणवत होता. काही दिवसांपूर्वी रक्तस्त्राव व उलट्या होऊ लागल्याने त्यांची प्रकृती खूपच बिघडली होती. स्थानिक डॉक्टरांकडून उपचार घेतले. परंतु, प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. खान यांची प्रकृतीत खालावल्याने कुटुंबियांनी त्यांना चेंबूर येथील झेन रूग्णालयात दाखल केलं. 

याठिकाणी वैद्यकीय चाचणीत अन्ननलिकेत 8 सेंटिमीटर ची गाठ असल्याचे निदान झालं. यावर शस्त्रक्रिया करणं हा एक पर्याय होता. त्यानुसार कुटुंबियांच्या परवानगीनुसार डॉक्टरांनी 8 ऑक्टोबर 2020 ला ही शस्त्रक्रिया केली. 

महत्त्वाची बातमी  निवृत्तीचं वय ५८ वर्षे ठेवावा ! खटुआ समितीचा अहवाल राज्याने फेटाळल्याची नोंद

झेन रूग्णालयातील संचालक आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. रॉय पाटणकर यांनी सांगितले की, "रूग्णाला उपचारासाठी आणलं तेव्हा त्याची प्रकृती खूपच चिंताजनक होती. त्यांना श्वास घेताना त्रास जाणवत होता. अशा स्थितीत एन्डोस्कोपीदवारे नेमकी काय समस्या आहे, हे जाणून घेतले. या वैद्यकीय तपासणीत रूग्णाच्या अन्ननलिकेत लिओमायोमा नावाचा ट्यूमर असल्याचे निदान झालं. यावर शस्त्रक्रिया करून ट्यूमर काढणं गरजेचं होतं. त्यानुसार कुटुंबियांची परवानगी घेऊन शस्त्रक्रिया केली. साधारणतः 3-4 तास ही शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस रूग्णाला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. त्यानुसार त्यांना घरी सोडण्यात आले."

"लेप्रोस्कोपिकद्वारे शस्त्रक्रिया करून अन्ननलिकेतील ट्यूमर काढण्यात आला आहे. ही एक दूर्मिळ लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया आहे. कारण अशा ट्यूमर काढण्यासाठी छातीला छेद द्यावा लागतो. परंतु, ही शस्त्रक्रिया छेद न करता दुर्बिणीच्या सहाय्याने करण्यात आली आहे. मुळात, अनेक वर्षांपासून अँसिडिटीचा त्रास असणे, वजन कमी होणं आणि वारंवार उलट्या होणं ही या ट्यूरची लक्षणं आहेत. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच निदान व उपचार झाल्यास रूग्ण पटकन बरा होऊ शकतो", असंही डॉ. पाटणकर म्हणाले. 

महत्त्वाची बातमी : 'लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट'; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालींवर राहील बारीक नजर

रूग्णाचा भाऊ तारिक खान म्हणाले की, जेव्हा भावाच्या अन्ननलिकेत ट्यूमर असल्याचे निदान झाले तेव्हा आम्ही खूप घाबरून गेलो होतो. तो जेवण नव्हता आणि वजनही कमी झाले होते. त्याला सतत उलट्या होत होत्या. परंतु, अशा स्थितीत केवळ डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे माझ्या भावाचे प्राण वाचू शकले.

( संपादन - सुमित बागुल )

tumor of eight centimeters extracted from the food track of 43 years old man 

loading image
go to top