उपासमारीला वैतागले! आणि ते सायकलवरून उत्तरप्रेदशात निघाले...

सकाळ वृत्तसेवा 
Thursday, 30 April 2020

लॉकडाऊनकाळात सायकल विक्री करणाऱ्या 3 दुकानदारांवरही गुन्हा दाखल

नवी मुंबई: पनवेल येथून सायकलवरुन उत्तरप्रदेश येथे जाणाऱ्या 57 व्यक्तींची तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी बुधवारी पहाटे धरपकड केली. पोलिसांनी या सर्वांवर तसेच त्यांना सायकल विकणाऱ्या 3 दुकानदारांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी या सर्वांना 15 दिवसांचे अन्नधान्य देऊन ते रहात असलेल्या ठिकाणी परत पाठवून दिले आहे.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पोलिसांनी पकडलेल्या 57 पैकी बहुतांश व्यक्ती पनवेलच्या बम्बई पाडा येथील तर काही तुर्भे इंदिरानगर भागात राहणारे आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशमधील असून सध्या ते नवी मुंबई-पनवेल भागात विविध ठिकाणी काम करुन आपला उदरनिर्वाह करत आहेत. लॉकडाऊनमुळे मागील दिड महिन्यांपासून कामधंदे बंद झाल्याने त्यांची उपासमार सुरु होती. त्यामुळे या सर्व कामगारांनी एकत्र येऊन पनवेलच्या तीन सायकल दुकानदारांकडून सायकल खरेदी करून बुधवारी पहाटेच्या सुमारास हे सर्वजण सायकलवरुन पनवेल येथून उत्तरप्रदेश येथे निघाले होते.

निर्देश आलेत, लॉकडाऊनमुळे अडकलेल्यांचा घरी परतण्याचा मार्ग मोकळा, जाणून घ्या प्रक्रिया.. 

या 57 जणांवर शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तसेच त्यांना सायकल देणाऱ्या 3 दुकानदारांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

२ मे पासून रुग्णालयांना लागू होणार 'हे' नवीन नियम, सरकारने घेतलेत 'मोठे' निर्णय...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Turbhe MIDC police arrested 57 persons traveling to Uttar Pradesh on bicycles