इंजिनिअरिंगला प्रवेश घ्यायचाय? शिक्षणमंत्री मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

  • अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारावीतील गुणांनाही महत्व ? 
  • उच्च व तंत्रशिक्षण विभाग विचाराधीन 

मुंबई : बारावी परीक्षा देणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधनिर्माण शास्त्र यासारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे असतो. अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी सीईटीच्या गुणांना महत्व देण्यात येते. त्यामुळे बारावीत अधिक गुण मिळवण्याकडे विद्यार्थ्यांचा कल कमी होऊ लागला आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीच्या गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग विचाराधीन असल्याचे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. 

विद्यापीठ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराचा विद्यार्थ्यांना फटका!

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशात बारावीच्या गुणांऐवजी सीईटीच्या गुणांना महत्व देण्यात येते. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांचा कल सीईटी परीक्षेत अधिक गुण मिळवण्याकडे वाढत आहे. परंतू याचा फटका विद्यार्थ्यांना प्रवेशावेळी बसत आहे. प्रवेशावेळी दोन विद्यार्थ्यांचे सीईटी परीक्षेतील गुण समान आल्यावर अशावेळी बारावीचे गुण त्याचप्रमाणे फिजिक्‍स, केमिस्ट्री, मॅथ्स किंवा बायोलॉजी या विषयांचे गुण पाहिले जातात. यामध्ये ज्याचे गुण अधिक असतील अशा विद्यार्थ्याला प्रवेशात प्राधान्य दिले जाते. या नियमांमध्ये सीईटी परीक्षेला अवास्तव महत्व निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता बदलण्यासाठी सीईटीच्या गुणांबरोबरच बारावीच्या गुणांचे महत्त्व कायम ठेवण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये सीईटी परीक्षेचे गुण व बारावीचे गुण एकत्रित करून निकाल लावण्यासंदर्भात किंवा अन्य कोणत्या मार्गाचा अवलंब करता येईल का याबाबत पडताळणी करत असल्याचे, सामंत यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twelve marks are also of importance for the admission of engineering