हळूहळू उद्योग खुलण्यास सुरवात; राज्यात २५ हजार कंपन्या सुरु, सहा लाख कामगार रुजू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 मे 2020

उदयोगांना सवलती देण्याचे संकेत, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

मुंबई : कोरोना संकटामुळे जगभरातील उद्योग, व्यापार ठप्प आहेत. कोरोनामुळे राज्यातही उद्योग क्षेत्रावर व्यापक परिणाम झाला आहे. मात्र राज्यात हळूहळू उद्योग खुलण्यास सुरवात झाली आहे. रेड झोन वगळता सध्या राज्यात ५७,७४५ उद्योगांना काम सुरु करण्यासाठी परवाने दिले आहेत. त्यापैकी २५ हजार कंपन्यांनी उत्पादन सुरू केले आहे. या कंपन्यामध्ये साडेसहा लाख कामगार रुजू झाले आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती दिली आहे. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स,  इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्यावतीने आयोजित बेवनारमध्ये बोलत होते.

मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड हा भाग रेड झोनमध्ये आहे. येथील उद्योग सुरू करण्याची मागणी होत आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी मे अखेर संपुर्ण राज्य ग्रीन झोन करायचा संकल्प केला आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी सहकार्य करावे अशी विंनतीही देसाई यांनी उद्योजकांना केले आहे. 

उद्यापासून 'या' शहरात सुरु होऊ शकतात पॅसेंजर ट्रेन

वीज बिलात सवलत
स्थिर वीज बिलाबाबत उर्जामंत्र्यांसोबत बैठक घेतली असून जेवढा विजेचा वापर होईल, तेवढेच बिल आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या शिवाय कर्जाचे हप्ते फेडण्यासाठीदेखील सवलती जाहीर केल्या आहेत, अशी माहितीही उद्योगमंत्र्यांनी दिली 

लघु उद्योगांसाठी लवकर आर्थिक पॅकेज
लॉकडाऊमुळे लघु उद्योजकांचे कंबरडे मोडले आहे. लवकरचं या लघु उद्योजकांसाठी केंद्र शासन आर्थिक पॅकेज जाहीर करणार आहे. त्यासंबधी  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सदानंद गौडा, पीयुष गोयल यांच्याशी चर्चा सुरु आहे. राज्य शासनही लघु उद्योगांना इतर सवलती देण्याचे धोरण आखत असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली.

ती मुलगी 'सिद्धार्थ' नावाने फेक अकाऊंट चालवत होती! BoiseLockerRoom ची चौकशी सुरू

विदेशी गुंतवणूकीसाठी प्रयत्न सुरु : 

राज्यात विदेशी गुंतवणूक येण्यासाठी वाटाघाटी सुरू झाल्या आहेत. अमेरिका, इंग्लड, जर्मनी, जपान, तैवान, दक्षिण कोरियासह अनेक देशातील प्रतिनिधी, उद्योग विभागाच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणूकीसंदर्भात चर्चा करत आहेत. पुढील काळात राज्यात अनेक मोठे प्रकल्प सुरू होणार असल्याने लघु उद्योगांनी सेवा पुरवण्यासाठी सज्ज रहावे, असं आवाहन उद्योगमंत्र्यांनी यावेळी केले.

राज्यात उद्योगाची चाक फिरली

  • रेड झोनमधील उद्योग सुरु करण्याला परवानगी नाही
  • ५७,७४५ उद्योगांना काम सुरु करण्यासाठी परवाना
  • यातील २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरु 
  • साडे सहा लाख कामगार कामावर हजर
  • पश्चिम महाराष्ट्रात ५७७४ कंपन्यांचे उत्पादन सुरु 
  • लघू उद्योगांना  विशेष सवलती मिळणार 
  • उद्योगांना विज बिलात सवलती देण्याचा प्रस्ताव 
  • विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी वाटाघाटी सुरु

twenty five thousand companies have started in maharashtra six lacs workers got job


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty five thousand companies have started in maharashtra six lacs workers got job