ती मुलगी 'सिद्धार्थ' नावाने फेक अकाऊंट चालवत होती! BoiseLockerRoomची चौकशी सुरू

ती मुलगी 'सिद्धार्थ' नावाने फेक अकाऊंट चालवत होती! BoiseLockerRoomची चौकशी सुरू

नवी दिल्ली ः सामूहिक बलात्काराचे समर्थन तसेच वर्गातील मुलींवर बलात्कार करण्याची चर्चा आणि त्यानंतर एका मुलीने कसे ते उघडकीस आणले याची खूप चर्चा काही दिवस सुरु होती. प्रत्यक्षात `सिद्धार्थ' या नावाने एका मुलीनेच एक प्रोफाईल तयार करुन त्यावर आपल्याच अत्याचाराची चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला असे चौकशीत आढळले आहे. मात्र त्याचवेळी या ग्रुपची चौकशी सुरु आहे. 

पोलिसांनी या बॉईस लॉकर रुमवरील ग्रुपबाबत चौकशी सुरु केली. 'सिद्धार्थ' सोडून सर्वच मुलांनी त्या मुलीची लैगिक छळवणूक करण्यास नकार दिला. एवढेच नव्हे तर त्या चर्चेपासूनही स्वतःला दूर ठेवले. पोलिसांच्या या चौकशीत खूपच धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. स्नॅपचॅटवरील चर्चेचा स्क्रीनशॉट खूपच व्हायरल झाला. पण त्यावरील संभाषणाचा एकमेकांशी संबंध नसल्याचे दिसले आहे. एका मुलीने `सिद्धार्थ' या नावाने एक खोटा अकाऊंट सुरु केला. त्याद्वारे वर्गातील मुलांबरोबर चर्चा सुरु केली. ते लैंगिक अत्याचारावर कशी प्रतिक्रिया देतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, असे तपासात आढळले आहे.

याबाबतचे अनेक स्नॅपशॉट व्हायरल झाले आहेत. त्यातील एक स्नॅपशॉट दोघातील चर्चेतील आहे. त्यातील एकाने आपले नाव `सिद्धार्थ' सांगितले आहे. त्यानेच मुलीची छळवणूक करण्याबाबत सूचवले. तपासात `सिद्धार्थ' हा मुलगी असल्याचे समजले. तीने तिचे नाव सूचवले होते, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी त्या मुलीची चौकशीही केली. तिने मुलांच्या मनात नेमके काय हे जाणून घेण्यासाठी आपण हे केले असल्याचे सांगितले. 

`सिद्धार्थ'ने ज्या मुलाबरोबर चर्चा केली. त्याने त्याच्या मित्रांबरोबर संभाषणाचे स्क्रीनशॉट शेअर केले. त्यातीलच एकाने हा स्क्रीनशॉट इन्ट्राग्रामवर पोस्ट केला. तो व्हायरल झाला. सुरुवातीस बॉईज लॉकर रुम गटात याबाबत चर्चा झाली असाच समज झाला. मात्र या ग्रुपमधील एकाचाही त्यात थेट सहभाग नसल्याचे समजले. चौकशी करणाऱ्या पथकाने यानंतरही लॉकर रुमची चौकशी थांबवलेली नाही. पोलिसांनी ग्रुपच्या अॅडमिनला यापूर्वीच ताब्यात घेतले. तो सुधारगृहात आहे. ग्रुपमधील 27पैकी 24 मुलांची चौकशी झाली आहे. दोघांशी संपर्क साधला गेलेला नाही, तर एकाची माहीती घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्या तिघांची माहिती घेतली जात आहे. एवढेच नव्हे तर ग्रुपमधील दोघांचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत आणि त्यांची तपासणी सुरु आहे. 

आता या प्रकरणी मुलीवरही कोणतीही कारवाई न करण्याचे पोलिसांनी ठरवले आहे. खोटा प्रोफाईल तयार करणे चूकीचे आहे, पण तिचा उद्देश काही वाईट नव्हता, त्यामुळे तिच्याविरुद्ध कोणतीही तक्रार नोंदवली जाणार नाही असे पोलिस आधिकाऱ्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com