असं सगळीकडेच व्हावं ! शिवडीत 'इतक्या' हजार लोकांची केली गेलीये आरोग्य तपासणी...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अनेक सामाजिक तसेच राजकीय कारकर्ते लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये राहिवाश्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून  ज्या गरजूंना अन्न-धान्याची गरज आहे त्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे.

मुंबई , ता.  4 : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन अनेक सामाजिक तसेच राजकीय कारकर्ते लोकांच्या मदतीसाठी रस्त्यावर उतरले आहेत. अनेक सोसायट्यांमध्ये राहिवाश्यांची आरोग्य तपासणी करण्यात येत असून  ज्या गरजूंना अन्न-धान्याची गरज आहे त्यांना त्याचे वाटप करण्यात येत आहे.

मुंबईतील शिवडी, परळ, प्रभादेवी या परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रहिवाश्यांना आपल्या आरोग्य तपासणीची गरज वाटत असली तरी खासगी दवाखाने बंद असल्याने त्यांना तपासणी करता येत नाही. राहिवाश्यांची ही अडचण लक्षात घेऊन भाजपचे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष नाना अंबुरे यांनी पुढाकार घेऊन मदत सुरू केली आहे. मोठी लोकसंख्या असलेल्या शिवडी विधानसभा मतदारसंघातील लोकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. थर्मल मशीन आणि पल्स ऑक्सिमीटर ने सज्ज पथक बनवण्यात आली आहेत. या पथकांच्या माध्यमातून लोकांची तापासणी करण्यात येत आहे. 

अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

परळ मधील श्री कृष्ण सोसायटीत आज अडीच हजार लोकांची तपासणी करण्यात आली. पथकांच्या माध्यमातून लोकांची सर्दी,ताप,खोकला तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येत आहे.  गेल्या 15 दिवसात अश्या प्रकारे आत्तापर्यंत शिवडी विधानसभा परिसरातील 25 हजाराहून अधिक लोकांची तपासणी करण्यात आली आहे. तर पुढील काही दिवसात या परिसरातील सर्व लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. 

अबब! गरिबांच्या जेवणावरही डोळा, 80 हजार जेवणाची पाकीटं खाल्ली तरी कोणी?

मुंबईत कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. शिवडी,परळ, प्रभादेवी,लोअर परळ, वरळी  परिसरात रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात भीतीने घर केले आहे. मात्र खासगी दवाखाने बंद असल्याने लोकांना आपली तपासणी करून घेण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे सर्व सोसायट्यांमधी लोकांची तापसणणी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नाना आंबोले यांनी सांगितले. शिवाय इतर परिसरातील लोकांना आपली तपासणी करून घ्यायची असल्यास पालिकेच्या परवानगीने तिथेही पथकं पाठवून तपासणी करून घेणार असल्याचे ही ते म्हणाले.

twenty five thousand people are checked in shivadi mumbai due to corona fear


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: twenty five thousand people are checked in shivadi mumbai due to corona fear