अन् दारुची दूकाने उघडलीच नाही... नवी मुंबईतील तळीरामांचा हिरमोड

सकाळ वृत्तसेवा 
Monday, 4 May 2020

लॉकडाऊनची नियम शिथिल होणार असल्याने दारूची दूकाने उघडतील या आशेने पहाटेपासून नवी मुंबईत ठिक-ठिकाणी दारूच्या दूकानांबाहेर ठाण मांडून बसलेल्या तळीरामांचा हिरमोड झाला. पहाट उजडून सकाळची उन्हं डोक्यावर आली तरी दूकानांचे शटर न उघडल्याने मद्यपींना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. काही ठिकाणी दूकानांबाहेरची गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलिसांना खाक्या दाखवावा लागला. 

नवी मुंबई : लॉकडाऊनची नियम शिथिल होणार असल्याने दारूची दूकाने उघडतील या आशेने पहाटेपासून नवी मुंबईत ठिक-ठिकाणी दारूच्या दूकानांबाहेर ठाण मांडून बसलेल्या तळीरामांचा हिरमोड झाला. पहाट उजडून सकाळची उन्हं डोक्यावर आली तरी दूकानांचे शटर न उघडल्याने मद्यपींना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. काही ठिकाणी दूकानांबाहेरची गर्दी कमी होत नसल्याने अखेर पोलिसांना खाक्या दाखवावा लागला. 

धारावीत 'या' वयोगटातील रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक! वाचा ही चिंताजनक माहिती आली समोर

नवी मुंबई शहरात बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, तुर्भे, घणसोली आणि ऐरोली येथे दारूच्या दूकानांबाहेर तळीरामांनी दारूसाठी गर्दी केली होती. पुन्हा दूकाने उघडतील की नाही या भीतीपोटी काहींनी हातात दोन-तीन पिशव्या घेऊन भरगच्च दारू खरेदीच्या इराद्याने रांग लावली होती. सीबीडी सेक्टर १५ येथे दूकानांबाहेर लागलेली रांग अर्ध्या किलोमीटर पर्यंत गेली होती. महेश वाईन श़प बाहेर लागलेली रांग सेक्टर १५ पर्यंत गेली होती. नेरूळ, वाशी, ऐरोली, तुर्भे अशा सर्वच भागात दारूच्या दूकानांबाहेर मद्यपींनी गर्दी केली होती. दूकानांबाहेर रांग लावताना तळीरामांकडून सोशल डिस्टसिंगचे नियम तंतोतंत पाळले होते. रांगेत उभे राहताता सोशल डिस्टंस ठेवून तसेच तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधून उभे होते. सकाळ जाऊन दुपारचे उन डोक्यावर आल्यानंतरही काही ठिकाणची गर्दी ओसरत नव्हती. रांगेतून बाहेर पडलो आणि दूकान उघडे झाले तर.. या भीतीपोटी कोणीच घरी जात नव्हते. अखेर सीबीडी सेक्टर ११ मध्ये दूकानाच्या बाहेर झालेली गर्दी कमी होत नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी दूकाने उघडणार नसल्याचे सांगितले. परंतू त्यानंतरही गर्दी हटत नसल्याने अखेर पोलिसांना आपला खाक्या दाखवून जमावाला पांगवावे लागले. 

धक्कादायक! लॉकडाऊनमध्ये 200 भटक्या कुत्र्यांचा मृ्त्यू

कन्टेन्मेंट झोनचा दारूच्या दूकानांना फटका
जीवनावश्यक वस्तूंच्या दूकानांसोबत दारूची दूकाने खुली करताना राज्य सरकारने जे परिपत्रक काढले आहे. त्या परिपत्रकात रेड झोनमध्ये दारूची दूकाने उघडताना स्थानिक प्रशासनाने गरजेप्रमाणे परवानगी द्यावी असे म्हटले आहे. त्याप्रमाणे जिल्हाधिकारी हा निर्णय घेणार आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना अद्याप कन्टेन्मेंट झोनप्रमाणे परिसराची नोंद मिळाली नसल्याने ठाणे जिल्ह्यात दारूची दूकाने खुली करण्यात अडचणी येत आहेत. तसेच नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दारूची दूकाने उघडणार नाहीत असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The liquor store not opened in navi mumbai