esakal | निलेश राणे VS रोहित पवारांमधील ट्विटर वॉर शिगेला, थेट 'लायकी'ची भाषा
sakal

बोलून बातमी शोधा

निलेश राणे VS रोहित पवारांमधील ट्विटर वॉर शिगेला, थेट 'लायकी'ची भाषा

माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातला ट्विटर वॉर शिगेला पोहोचला आहे.

निलेश राणे VS रोहित पवारांमधील ट्विटर वॉर शिगेला, थेट 'लायकी'ची भाषा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई- माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातला ट्विटर वॉर शिगेला पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये ट्विटरवर वाद सुरु आहे. आता रोहित पवारांच्या एका खोचक ट्विटला राणेंनी उत्तर दिलं आहे. त्या ट्विटला देताना राणेंनी थेट 'लायकी' अशा भाषेचा वापर केला आहे. त्यामुळे या नेत्यांमधला वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे. त्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, आपले विचार, आपली भाषा आणि आपलं काम यातून आपण कोण आहोत हे लक्षात येतं. काही गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्या सोडून द्यायच्या असतात, पण एकाच गोष्टीला कवटाळून आपल्या विचारांचं प्रदर्शन करण्यात निलेश राणे यांचा नंबर पहिला लागतो.

मोठी घोषणा, 1 जूनपासून धावणार नॉन AC ट्रेन्स, तिकिट बुकींगची प्रक्रिया जाणून घ्या...

रोहित पवारांच्या या ट्विटला निलेश राणे यांची प्रत्युत्तर दिलं. यावेळी निलेश राणे यांनी कडवट भाषेचा वापर केला आहे. निलेश राणेंनी ट्विटमध्ये म्हटलं की,  बोलणाऱ्याची लायकी बघून उत्तर देतो मी. धमकी आणि कळ काढायची भाषा माझ्याबरोबर करायची नाही. प्रदर्शन नाही हा ट्रेलर आहे. तुझ काम माहीत आहे मला, बोलत राहिलास तर त्याचं पण ट्रेलर देईन मग लोकंच चप्पलेच्या प्रदर्शनात बसवतील तूला.

त्यानंतर काही मिनिटांपूर्वी निलेश राणेंनी आणखी एक ट्विट केलं आहे. यात रोहित पवारांनी देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या टिकेला उत्तर दिलं आहे. शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून विविध मागणी करत आहे. त्यांनी एखादं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही लिहून शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर करण्याची मागणी करावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला होता. त्यावर रोहित पवारांनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. फडणवीसजी, पवार साहेबांच्या पत्राची चिंता करण्याऐवजी राज्यासाठी आपण काय करतो यावर आत्मपरीक्षण करा, असा टोला रोहित पवार यांनी हाणला आहे. 

आता यावरुनही निलेश राणेंनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे. ट्विट करुन राणे म्हणाले की, गल्लीतलं शेंबडं पोर लहान लहान गोष्टीसाठी कसं किर किर करत अस्त तसं एक शेंबडं माझ्या आजोबांच्या पत्रावर कोणी बोलू नका म्हणून किर किर करतंय... ह्या वांग्याची लायकी काय आमच्या नेत्यांवर बोलायची? कोपर्डीची घटना, मराठा क्रांती मोर्चे झाले पण हा लुक्का तेव्हा काही बोलाल नाही.

या ट्विटर वॉरमुळे निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यामध्ये आणखी वाद चिघळणार असल्याची चर्चा आहे. 

नेमका वाद काय आहे? 

लॉकडाऊनमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली होती. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले होते की, साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??

त्यावर त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं. 

मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजींही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असं ट्विट रोहित पवारांनी केली. काळजी नसावी असे शब्द वापरुन त्यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं. 

मुंबई मेट्रोनं घेतला 'हा' महत्वाचा निर्णय..लॉकडाऊन संपल्यानंतर होणार महत्वाचा बदल.. 

दरम्यान रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलेल्या ट्विटवर निलेश राणेंनी पुन्हा एकदा धारदार भाषेचा वापर करत त्यांच्यावर टीका केली होती. रोहित पवारांचं ट्विट रिट्विट करुन निलेश राणेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.  यावर त्यांनी दोन ट्विट करत बोचऱ्या शब्दांचा वापर केला आहे. पहिल्या ट्विटमध्ये निलेश राणेंनी म्हटलं की, मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.

तर दुसऱ्या शब्दात हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.

twitter war between nilesh rane and rohit pawar read fill report

loading image