निलेश राणे- रोहित पवारांमध्ये ट्विटरवर जुंपली, वाद चिघळणार 

nilesh rane and rohit pawar
nilesh rane and rohit pawar

मुंबई- माजी खासदार निलेश राणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यात ट्विटरवर चांगलीच जुंपली आहे. निलेश राणे यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यावर पुन्हा एकदा निलेश राणेंनी त्यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. त्यामुळे या दोन्ही तरुण नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडली असून हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. 

लॉकडाऊनमुळे साखर उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे साखर उद्योगाला विशेष पॅकेज देण्याची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. याच पार्श्वभूमीवर निलेश राणे यांनी शुक्रवारी एक ट्विट केलं होतं. त्या ट्विटमध्ये निलेश राणे म्हणाले होते की, साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर ऑडिट झालंच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षों वर्ष साथ देत आलेत. तरी वाचवा??

या ट्विटमध्ये निलेश राणेंनी साखर उद्योगाला आजवर देण्यात आलेल्या आर्थिक मदतीबद्दल सवाल उपस्थित केले. त्यावर त्यांच्या या टीकेला रोहित पवारांनी ट्विटरच्या माध्यमातूनच प्रत्युत्तर दिलं. 

मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार साहेबांनी साखर उद्योगासह 'कुक्कुटपालन' आणि इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजींही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी, असं ट्विट रोहित पवारांनी केली. काळजी नसावी असे शब्द वापरुन त्यांनी राणेंना प्रत्युत्तर दिलं. 

दरम्यान आता निलेश राणे आणि रोहित पवार यांच्यात कमालीचे युद्ध पेटल्याचं चित्र दिसतंय. रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलेल्या ट्विटवर निलेश राणेंनी पुन्हा एकदा धारदार भाषेचा वापर करत त्यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

रोहित पवारांचं ट्विट रिट्विट करुन निलेश राणेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर त्यांनी दोन ट्विट करत बोचऱ्या शब्दांचा वापर केला आहे. पहिल्या ट्विटमध्ये निलेश राणेंनी म्हटलं की, मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही... कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोल्यावर मिरची का लागली??? मतदार संघावर लक्ष दे सगळी कडे नाक टाकू नकोस नाही तर साखरकारखान्या सारखी हालत होईल तुझी.

तर दुसऱ्या शब्दात हे रोहित पवार सारखे शेंबडे लुडबुड करत असतात. साखरेवर बोललो की हे अस्वस्थ का होतात कुणास ठाऊक?? महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात संपत्ती एका दिशेने जात असेल तर प्रश्न नाही विचारायचे?? ह्या वांग्याला सांगा ते ठाकरे मुंबईत राहून नाय काय करू शकले हा तर अजून स्वतःची धुवायला शिकतोय.

आता निलेश राणेंच्या ट्विटमुळे या दोघांमध्ये हे ट्विटरवॉर नक्कीच पेटण्याची शक्यता असून  राणे यांच्या ट्विटला रोहित पवार काय उत्तर देतात हे पाहावं लागेल.

twitter war betwen nilesh rane and rohit pawar  read full story 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com