Mumbai Drug Case : ड्रग्ज विक्रीस आलेल्या दोघांना अटक; जागरूक नागरिकांच्या सतर्कतेने प्रकार उघडकीस

आता पोलिसांना रहावे लागणार हाय अलर्टवर
Mumbai Drug Case
Mumbai Drug CaseSakal
Updated on

डोंबिवली- डोंबिवलीतील खोणी येथे ड्रग्ज या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. खोणी पलावा परिसरातील जागरूक नागरिकांनी ही बाब मानपाडा पोलिसांच्या लक्षात आणून दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकत दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून एमडी नावाचं ड्रग्ससह अडीच लाख रुपये केले जप्त करण्यात आले आहेत. येत्या डिसेंबर महिन्यात वर्षाची सांगता आहे तर नविन वर्षाच्या आधीच डोंबिवलीत ड्रग्स सापडल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता हाय अलर्टवर रहावे लागणार आहे.

खोणी पलावा येथील हाय प्रोफाईल परिसरात नागरिकांच्या सतर्कतेमुळे अमली पदार्थाची होणारी तस्करी उघडकीस आली आहे. कल्याण डोंबिवली मध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असून येथील तरुणाई नशेच्या विळख्यात सापडत असल्याचे दिसून येत आहे.

त्यातच जागरूक नागरिकांनीच आता ड्रग्स विक्री करणाऱ्या दोघांना पकडण्यात जागरूकता दाखवल्याचे दिसून आले आहे. येथील नागरिकांनी याची माहिती मानपाडा पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून दोघाना अटक केली. त्यांच्याकडून एमडी नावाचं ड्रग्ससह अडीच लाख रुपये केले जप्त करण्यात आले आहेत.

दोघा तरुणांना मानपाडा पोलीस स्थानकात आणण्यात आले असून हे ड्रग्स किती ग्राम आहे व कोणाला विक्रीसाठी आणले होते याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. दरम्यान अमली पदार्थाचे आणि रोख रक्कमेचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

नववर्षाच्या पूर्वसंध्येला मोठ्या प्रमाणात पार्ट्या आणि जल्लोष केला जातो. या पार्ट्यांमध्ये अनेक वेळेला अमली पदार्थ घेणारे तरुण आढळले असून पोलिसांनी कारवाई सुद्धा केली आहे. मात्र डोंबिवलीत नोव्हेंबर महिन्यातच अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या दोघांना नागरिकांच्या सतर्कतेने पोलिसांनी दोघांना पकडले आहे.

या दोघांकडे ड्रग्स आणि रोख रक्कम सापडल्याने खोणी पलावा सारख्या हाय प्रोफाइल परिसरात एकच खळबळ माजली आहे. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात बार अँड रेस्टॉरंट तसेच आर्केस्ट्रा बार आहेत. त्यामुळे हे अमली पदार्थ तरुणाई पर्यत पोहोचू नये याची दक्षता आता पोलिसांना घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com