घरात घुसून गँगरेप... धारावीत दोघांना अटक

Rape case
Rape casesakal media

घरात घुसून एका 19 वर्षीय विवाहित तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला होता.(Dharavi Gang Rape)

धारावी झालेल्या या दुर्घटनेत आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचं पीडितेने सांगितलं होतं. यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी परिसरातील सीसीटिव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली. तसेच आरोपी याच परिसराती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अखेर या प्रकरणात पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. धारावी पोलिसांनी कारवाई करत दोन दिवसात आरोपींचा छडा लावला. (Mumbai Gang Rape News)

घरात एकट्या महिलेला पाहून दोन आरोपींनी डाव साधला होता. घरात घुसून चाकूच्या धाकाने या महिलेवर बलात्कार करण्यात आला. त्यानंतर धारावी पोलिसांनी दोन्ही आरोपीना अटक केलीय.

Rape case
धारावीत 19 वर्षांच्या विवाहित तरूणीवर घरात घुसून समूहिक बलात्कार

घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला होता

रावीत एक 19 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. पहाटेच्या सुमारास दोन आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत संबंधित पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, यावेळी आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही पीडितेने पोलिसांना जबाबात सांगितले आहे. दरम्यान, ओळख लपवण्यासाठी आरोपींनी स्वतःचे चेहरे कापडाच्या सहाय्याने झाकले होते. त्यामुळे हे आरोपी नेमकं कोण होते हे ओळखता आले नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com