धारावीत 19 वर्षांच्या विवाहित तरूणीवर घरात घुसून समूहिक बलात्कार | Crime News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Crime News

धारावीत 19 वर्षांच्या विवाहित तरूणीवर घरात घुसून समूहिक बलात्कार

मुंबई : घरात घुसून एका 19 वर्षीय विवाहित तरूणीवर सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकर धारावीतून (Dharavi) समोर आला आहे. एवढेच नव्हे तर, आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड (Video) केल्याचे पीडितेने सांगितले आहे. घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी परिसरातील सीसीटिव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच आरोपी याच परिसराती असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Gang Raped In Mumbai Dharavi Area)

याबाबत अधिक माहिती अशी की, धारावीत एक 19 वर्षीय महिला वास्तव्यास आहे. पहाटेच्या सुमारास दोन आरोपींनी घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवत संबंधित पीडितेवर सामूहिक बलात्कार केला. एवढेच नव्हे तर, यावेळी आरोपींनी घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचेही पीडितेने पोलिसांना जबाबात सांगितले आहे. दरम्यान, ओळख लपवण्यासाठी आरोपींनी स्वतःचे चेहरे कापडाच्या सहाय्याने झाकले होते. त्यामुळे हे आरोपी नेमकं कोण होते हे ओळखता आले नाही.

हेही वाचा: Delhi fire: PM मोदींपाठोपाठ अरविंद केजरीवालांची मदतीची मोठी घोषणा

दरम्यान, पीडितेवर सामूहि बलात्कार करणारे आरोपी याच भागातील रहिवासी असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपसले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, राज्यातील वाढत्या बलात्काराच्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकाद ऐरणीवर आला आहे.

Web Title: Mumbai 19 Year Old Married Woman Was Gang Raped

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top