
नवी मुंबई (वार्ताहर) : बेलापूर येथील सिडको कार्यालयासमोरील पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या आगीत दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. या पार्किंगलगतच्या गवताला लागलेल्या आगीमुळे तेथे उभ्या असलेल्या दोन्ही कारने पेट घेतल्याचे प्राथमिक चौकशीत आढळून आले आहे.