सकाळ इम्पॅक्ट: बजेटमध्ये पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची रस्त्यासाठी २ कोटींची तरतूद

दापुरमाळ येथे विज पुरवठ्यासाठी महावितरचा प्रस्ताव सादर
eknath shinde
eknath shindesakal media

खर्डी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून मूलभूत सुविधांपासून (Basic facilities) वंचित, तसेच गावात जाणाऱ्यांसाठी रस्ता ही नसलेल्या शहापूर (shahpur) तालुक्यातील अतिदुर्गम दापूरमाळ भागातील प्रश्न आता सुटणार आहेत. या भागातील समस्यांविषयी ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (rajesh narvekar) यांच्या सूचनेनंतर महावितरणने या भागात वीजपुरवठा करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पुढाकाराने अर्थ संकल्पात या गावाच्या रस्त्यासाठी दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी दिली आहे.

eknath shinde
मुंबई - कलिना विद्यापीठात बॉम्बस्फोटाची खोटी माहिती देणारा अटकेत

दापूरमाळच्या समस्या सोडवण्यासाठी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे व जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. शहापूर तालुक्यातील अतिदुर्गम दापूरमाळ येथील आदिव गावाचा काही दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी शासकीय अधिकाऱ्यांसोबत दौरा करून तेथील मूलभूत सुविधा म्हणजे वीज, पाणी, रस्ता या समस्या सोडविण्यासाठी सूचना केल्या.

त्याच अनुषंगाने बुधवारी (ता. ९) दापूरमाळ गावासाठी तहसीलदार नीलिमा सूर्यवंशी यांनी त्यांच्या दालनात संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. प्रथम गावात वीजपुरवठा होण्यासाठी महावितरण विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणला निधी मंजूर केल्याने लवकरच वीज जोडणीचे काम सुरू होईल. तसेच दापूरमाळसाठी पालकमंत्र्यांच्या सहकाऱ्याने रस्त्यासाठी अर्थसंकल्पात दोन कोटींची तरतूद प्रस्तावित केल्याने लवकरच दापूरमाळवासीयांची पायपीट थांबणार आहे.

नागरिकांकडून स्वागत

अनेक वर्षांपासून वीज आणि रस्त्यासारख्या सुविधांपासून दापूरमाळ परिसरातील नागरिक वंचित होते. मात्र, आता या भागातील समस्या सुटणार असल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी यांचे आभार मानत काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com