मुंबई : तलवारीनं केक कापला, बर्थ डे बॉय जेरबंद

culprit arrested
culprit arrestedsakal

मुंबई : मुंबईत रस्त्यावर साजऱ्या केलेल्या वाढदिवसाची पार्टी (birthday party) दोन तरुणांना चांगलीच महागात पडली आहे. मुंबईतल्या कांदिवलीत (kandivali) रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापणाऱ्या दोघांना पोलिसांनी (culprit arrested) अटक केलीय. सिलम सुब्रमण्यम (२२) आणि कौसर खान (२३ ) असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कांदिवलीतल्या एका मॉलजवळ हे तलवारबाज मित्र बर्थडे सेलिब्रेशनसाठी जमा झाले होते. रस्त्यावर केक कापण्यासाठी बर्थडे बॉयनं चक्क तलवार आणली. सोशल मीडियावर (video viral on social media) या तलवारबाजीचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी तपास करत सिलम आणि कौसरला अटक केली. असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं दिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून तलवारीनं केक कापण्याचं फॅड वाढलंय. तलवारीनं केक कापण्याच्या निमित्तानं परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला जातो. (Two culprit arrested celebrating birthday party on road at kandivali using a sword to cut the cake)

culprit arrested
५० सीसीटिव्ही तपासले, २ सोनसाखळी चोर पकडले

लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जीवघेण्या स्टंटबाजी करणाऱ्यांच्या पोलिसांनी अनेकदा मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईच्या कांदिवली परिसरात अशीच एक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीसाठी हिरोगीरी करणाऱ्या एकाने चक्क तलवारीनेच केक कापला. या पार्टीत सहभागी झालेल्यांनी कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आली. हे दृष्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली आणि याप्रकरणी बुधवारी दोघांना अटक केलीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवलीच्या परिसरात एका मॉल जवळ सोमवारी वाढदिवसाच्या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीचं सेलिब्रेशन बेकायदेशीरपणे केलं होतं. या पार्टीत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com