esakal | Drugs Case - गोरेगावमधून नायजेरियन नागरिकाला अटक; आतापर्यंत २० जण NCB च्या ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Drugs

Drugs Case - गोरेगावमधून नायजेरियन नागरिकाला अटक; आतापर्यंत २० जण ताब्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गोरेगावमध्ये आणखी एका परदेशी नागरिकाला ड्रग्ज प्रकरणी अटक केली आहे. कार्डेलिया ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने कारवाई केली असून नायजेरियन नागरिकाकडून कोकेन जप्त करण्यात आले. त्याला कोर्टात हजर करण्यात येणार असल्याची माहिती एनसीबीने दिली. तपासातील महत्त्वाचे धागेदोरे यामुळे हाती लागल्याचंही एनसीबीने म्हटलं आहे.

हेही वाचा: आर्यन खानसह तिन्ही आरोपी विदेशी ड्रग्स तस्करांच्या संपर्कात - NCB

एनसीबीने ताब्यात घेतलेल्या नायजेरियन व्यक्तीचं नाव ओकारो ओउझमा असं आहे. शनिवारी रात्री गोरेगावमध्ये एनसीबीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतलं. आतापर्यंत कार्डेलिया क्रूज ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या २० वर पोहोचली असल्याचं एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी सांगितलं.

गेल्या आठ दिवसांपूर्वी मुंबईन एनसीबीने मुंबईवरून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापेमारी केली होती. याठिकाणी सुरू असलेली ड्रग्स पार्टी उधळून लावली होती. या कारवाईत ड्रग्ज जप्त करण्यात आले होते तसेच शाहरुखचा मुलगा आर्यनसह आठ जणांन ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांची कसून चौकशी करण्यात आल्यानंतर थोड्या वेळापूर्वीच अटकेची कारवाई करण्यात आली आहे. एनसीबीने शाहरुखचा मुलगा आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेचा या तीन जणांना अटक केली आहे. एनडीपीएस अ‍ॅक्टच्या सेक्शन २७ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर एनसीबीने मुंबईत ठिकठिकाणी छापेमारी सुरू केली.

दरम्यान, शनिवारी रात्री देखील गोरेगाव परिसरात छापा टाकण्यात आला. यामध्ये दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ही छापेमारी सुरू असून एनसीबीने सांताक्रूझ भागातून एका ड्रग्ज विक्रेत्याला अटक केली आहे.

loading image
go to top