Navi Mumbai Fraud : नवी मुंबईत एकलहरी बाबा, टणटण बाबाला अटक; दोघांनी मिळून महिलेला फसवलं; अघोरी पूजेच्या नावे...

woman cheated in name of aghori puja in Mumbai: काळी जादू, अघोरी पूजेच्या नावाखाली १.९० लाखांची लूट; नाशिकपर्यंत पळालेल्या भोंदूबाबांना एनआरआय सागरी पोलिसांची २४ तासांत बेड्या
Occult Ritual Fraud: Woman Cheated by Fake Babas, Arrested in Navi Mumbai”

Occult Ritual Fraud: Woman Cheated by Fake Babas, Arrested in Navi Mumbai”

esakal

Updated on

नवी मुंबई: तुमच्यावर काळी जादू झाली असल्याने मोठे संकट येणार आहे, अशी भीती दाखवत दोन भोंदूबाबांनी सीबीडी बेलापूरमध्ये - एका महिलेच्या घरात पूजा घातली. तसेच तिच्याकडून सुमारे एक लाख ९० हजार रुपये उकळून पसार झाले; मात्र एनआयआय सागरी पोलिसांनी तक्रार मिळताच २४ तासांत दोघांनाही अटक केली. अर्जुन भरत चव्हाण ऊर्फ टणटण बाबा (वय २१) आणि सागर शिवाजी शिंदे ऊर्फ एकलहरी बाबा (वय २४) असे अटक केलेल्या - भोंदूबाबांचे नाव आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com