मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र फॉरवर्ड केले म्हणून माजी नौदल अधिकाऱ्यांना शिवसैनिकांची बेदम मारहाण; कठोर कारवाईची भाजपची मागणी

राजू परुळेकर
Friday, 11 September 2020

कांदिवली पूर्व येथील कांदिवली निवृत्त नौदल अधिकारी  मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे.

मुंबई - कांदिवली पूर्व येथील कांदिवली निवृत्त नौदल अधिकारी  मदन शर्मा यांना शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. या भ्याड हल्ल्याचा आमदार अतुल भातखळकर यांनी तीव्र निषेध केला. असे क्रृर कृत्य करणाऱ्या गुंडांवर  तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

ड्रग्जच्या विषयाकडे मुंबई पोलिसांनी बारकाईने लक्ष देण्याची गरज; शरद पवार यांची सूचक प्रतिक्रीया

निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांचे फक्त व्यंगचित्र व्हॉट्सअपवरुन फॉरवर्ड केले. म्हणून शिवसेनेच्या दोन शाखाप्रमुख व अन्य कार्यकर्त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच त्यांना मोठ्या प्रमाणावर जखमा झाल्या आहेत. आता निवृत्त सैनिक अधिकाऱ्यांवर सुद्धा हल्ला करण्याइतकी खालची पातळी शिवसेनेने गाठली आहे. अशा गुंडांना घाबरून राज्यातील व मुंबईतील जनता गप्प बसेल असे मुख्यमंत्र्यांना व शिवसेनेला वाटत असल्यास ते मोठ्या भ्रमात आहेत. सत्तेचा हा माज जनता येणाऱ्या काळात उतरवल्या शिवाय राहणार नाही असेही श्री. भातखळकर यांनी यावेळी संगितले.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याप्रकरणावर तीव्र प्रतिक्रीया दिली आहे. 

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two former naval officers attack by ShivSainiks